गंगापूर तालुक्यातील अनधिकृत शाळेवर कारवाई करण्याची लेसा संघटनेची मागणी.
गटशिक्षणाधिकारी समाधान आराख यांना लेसा संघटनेनी निवेदन दिले….
दैनिक आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर /प्रतिनिधी / गंगापूर तालुक्यातील अनधिकृत शाळेवर कारवाई करण्याची मागणी लेसा संघटनेने निवेदनाद्वारे गटशिक्षणाधिकारी समाधान आराख यांच्याकडे केली आहे.या निवेदनात असे म्हटले आहे कि, गंगापूर तालुक्यात काही शाळा अनधिकृतपणे सुरु आहेत.आरटीई नियमानुसार शाळेने योग्य ती मान्यता घेणे आवश्यक आहे.परंतु तालुक्यातील काही शाळा कोणतीही मान्यता न घेता राजरोसपणे सुरु आहे.या शाळा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करून पालकांची दिशाभूल करीत आहे.जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होते.त्यामुळे जूनपूर्वी अशा शाळा अनधिकृत शाळा म्हणून घोषित कराव्यात व त्यांच्यावर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.या निवेदनावर लासूर इंग्लिश स्कुल असोसिएशनचे (लेसा) प्रा.विशाल गायकवाड,प्रा.शशिकांत सांगविकर, प्रा.अशोक म्हस्के, शरद चव्हाण, योगेश तांबे,अनिलसिंग महेर आदींच्या स्वाक्षरी आहेत