महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या मराठवाडा विभागीय उपाध्यक्षपदी कचरू जाधव यांची नियुक्ती
कोअर कमिटीने केली निवड ; सर्वत्र अभिनंदन
फुलंब्री/प्रतिनिधी /महाराष्ट्र नाभिक महामंडळ मराठवाडा विभाग,उपाध्यक्षपदी श्री कचरूजी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली . श्री कचरूजी जाधव हे औरंगाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते असून त्यांच्या कार्याचे दखल घेऊन, सयाजी झुंजार, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ व घनश्यामजी वाघ, प्रदेश सरचिटणीस, महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांनी त्यांची नियुक्ती केली . प्रदेश उपाध्यक्ष विष्णु वखरे यांनी त्यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार केला .
महाराष्ट्र नाभिक महामंडळ या नाभिक समाजाच्या मातृ संस्थेचे सयाजी झुंजार यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर अगदी ठरवून या सर्व गोष्टींवर गांभीर्याने विचार करत जुन्या जाणत्या सर्व लोकांना एकत्र करून त्या कोअर कमिटीच्या कंट्रोल खाली महामंडळाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत असून महाराष्ट्रात सयाजीराव झुंजार (प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ) मा. दत्तशेठ अनारसे (नाभिक नेते व मार्गदर्शक महाराष्ट्र माजी अध्यक्ष) मा. रामदास दादा पवार (प्रदेश कोषाध्यक्ष) मा. घनश्याम वाघ (प्रदेश सरचीरणीस) यांनी सर्व दुर पदाधिकारी संर्पक दौरे करत असतांना मराठवाडा पदाधिकारी निवड करतांना औरंगाबाद येथील झुंजार नेत्तृत्व व विविध सामाजिक कार्यात भाग घेणारे कचरू जगन्नाथ जाधव यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्याकडे मराठवाडा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊ केली होती . २५ एप्रिल रोजी वरिष्ठांच्या सहमतीने संत सेना भवन हडको औरंगाबाद येथे मान्यवरांच्या उपस्थितीत कचरू जाधव यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला . यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विष्णु वखरे मनोज जाधव पद्माकर अमोदकर, विजय थोरात,प्रभाकर लिंगायत, विजय मोरे, सचिन गायकवाड,संजय पंडित ,प्रभाकर गायकवाड,अंकुश वर्पे,इत्यादी हजर होते. कचरू जाधव यांच्या निवडी नंतर महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रमुख सल्लागार दिलीप अनार्थे , कार्यकारणी सदस्य सुधाकर आहेर , मराठवाडा कार्याध्यक्ष दादासाहेब काळे , कर्मचारी संघटनेचे रंजित मथुरीया , लक्ष्मण धाकतोंडे संभाजी नगर जिल्हाध्यक्ष दिलीप गवळी , जिल्हाउपाध्यक्ष बद्रीनाथ वाघमारे जिल्हा संघटक कृष्णा वाघ , रत्नाकर बिडवे , भगवान पंडीत , विजय सोनवणे , सुमित पंडीत , कृष्णा वाघ , दिलीप वाघ , राजेश पांडव , चेतन लोखंडे , गजानन बिडवे , दुर्गादास आपार , सुनिल वैद्य सह अनेकांनी कचरू जाधव यांचे अभिनंदन केले आहे