Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादपैठण एमआयडीसी पोलिसांची धार्मिक स्थळावर भोंगे लावण्याबाबत बैठक

पैठण एमआयडीसी पोलिसांची धार्मिक स्थळावर भोंगे लावण्याबाबत बैठक

पैठण एमआयडीसी पोलिसांची धार्मिक स्थळावर भोंगे लावण्याबाबत बैठक
पिपंळवाडी/ प्रतिनिधि/पैठण एमआयडीसी पोलीस ठाणे येथे दि.(२३) बुधवार रोजी सकाळी दहा वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्या अंतर्गत येणाऱ्या गावागावांतील मंदिर,मस्जिद तसेच धार्मिक आणि प्रार्थना स्थळावर असणाऱ्या अनधिकृत भोंग्या (लॉड्स स्पीकर) बाबत मार्गदर्शन करण्यासाठीं पोलीस पाटील, सर्व मंदिराचे पुजारी तसेच मौलाना यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यांचे सपोनी ईश्वर जगदाळे यांनी सर्व धर्मियांना सुचना केली की, येथून पुढे आपण सर्वांनी कोणत्याही धार्मिक तसेच प्रार्थना स्थळावर भोंगे (लॉड्स स्पीकर्स) लावताना रीतसर अर्ज करत भोंगे लवण्यासंबंधी परवानगी घ्यावी.जर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोणत्याही धार्मिक स्थळावर  अनधिकृत भोंगे आढळले तर त्या भोंग्यावर कारवाई करण्यात येईल.त्यामुळे सर्वांनी याची दक्षता घेत मंदीर असो की मस्जिद किंवा कोणतेही प्रार्थनास्थळ असो त्याठिकाणी भोंगे लावताना रीतसर परवानगी घ्यावी या संबंधी सविस्तर सूचना/ मार्गदर्शन करण्यात आले. सदर बैठकीस एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गावचे पोलिस पाटील तसेच मंदिराचे पुजारी व मौलाना यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments