शिवशाही इंटरप्राईजेस एजन्सी ला काळ्या यादीत टाका
मराठवाडा – विदर्भ – खान्देश तिन विभागाला जोडणाऱ्या रस्ता डांबरीकरण व पुलाचे काम निकृष्ट…
अन्वर अली यांची तक्रार
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव/ प्रतिनिधी/ मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत नादा गाव ता. सोयगाव येथे पूल बांधकाम आणि रस्ता डांबरीकरण कामांची गुणवत्ता प्रत्यक्ष पाहणीतून उघडकीस आले होत असलेले काम निकृष्ट असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. ठिक ठिकाणी रस्ता लवकर खराब होत आहे, तर काही ठिकाणी पुलांची बांधणी योग्य नसल्याने, अशी तक्रार अन्वर अली यांनी (ता.१६) बुधवारी दिलिप स्वामी जिल्हाधिकाऱ्यासह, देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केली असुन या पुर्वी नांदा गावातील ग्रामस्थांनी सुध्दा प्रशासनातील अधिकाऱ्यांना लेखी तक्रारी दिल्या आहेत मात्र भ्रष्टाचारी ठेकेदार , प्रशासनातील अधिकारी कामाची पाहणी सुध्दा करित नाही. कॉलेटी कंट्रोल मार्फत गुणवत्तेची चौकशी व्हावी शिवशाही इंटरप्राईजेस या एजन्सी ला काळ्या यादीत टाकून योग्य ती कारवाई करा. अन्यथा संविधानीक मार्गाने आंदोलन करण्याचा सुचक ईशारा सुध्दा देण्यात आला आहे.
अन्वर अली अहेमद अली जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद छत्रपती संभाजीनगर जिल्हा पुरवठा विभागाचे अशासकीय सदस्य तथा मराठवाडा कार्याध्यक्ष केंद्रीय ग्राहक संरक्षण समिती यांनी दिलिप स्वामी जिल्हाधिकाऱ्याना बुधवारी दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, नांदा गाव ता. सोयगाव येथील नाल्यावरील पुलाचे बांधकाम व डांबरीकरणाचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत करण्यात येत आहे. निकृष्ट दर्जाचे पुलाचे काम व डांबरीकरण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. शासकीय गुत्तेदार शिवशाही इंटरप्राईजेसच्या कामगार व सुपरवाईजरला विचारणा केली असता ते याबद्दल उडवाउडवीचे उत्तरे देत आहेत. संबंधित काम चालू असताना कनिष्ठ अभियंता, अधिकारी व गुत्तेदार हे हजर राहत नाही. मजुराकडून अल्पमजुरी देऊन ठेकेदार काम करून घेत आहे. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांनी एकदाही पुलाचे निरीक्षण केलेले नसल्याचे समजते. तूमच्या स्वरातरावरून गुणवत्ता व दर्जेदार रस्ता व पुलाचे बांधकाम व्हावे म्हणून योग्य ती उपाययोजना हाती घेण्यात यावी या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधित शिवशाही इंटरप्राईजेस ठेकेदार च्या एजन्सीला काळ्या यादीत टाकून त्यांना सहकार्य करणारे कनिष्ठ अभियंता, जे कोणी वरिष्ठ सरकारी अधिकारी या कामात हात बरबटलेले असतील आणि गैरफायदा घेत असतील त्यांच्यावरती योग्य ती कार्यवाही करावी.अन्यथा संविधानीक मार्गाने तिव्र स्वरूपाचे आंदोलन करू , या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी तूमची राहिल असा सुचक ईशारा सुद्धा तक्रार निवेदनात दिला आहे.