28 एप्रिल रोजी सेवा हक्क दिनाचे आयोजन
जालना :- जिल्ह्यात सेवा हक्क दिवस तसेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 च्या दशकपुर्तीचे औचित्य साधून विविध उपक्रम राबवून हा दिवस जनसहभागासह साजरा करावा व नागरिकांमध्ये या अधिनियमाबाबत, राज्य सेवा हक्क आयोगाबाबत तसेच आपले सरकार पोर्टलमार्फत ऑनलाईन उपलब्ध सेवांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशित केले आहे. तरी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सोमवार दि.28 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता सेवा हक्क दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.), जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.


