जवखेडा खुर्द ते मोहाडी रस्त्याची खड्यांमुळे अपघात होतात

0
37
जवखेडा खुर्द ते मोहाडी रस्त्याची खड्यांमुळे अपघात होतात
वाहनधारक त्रस्त, रस्ता दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
कन्नड / प्रतिनिधी/ कन्नड-सिल्लोड मुख्य रस्त्यापासून जवखेडा
खुर्द ते फाटा दोन किलोमीटर अंतरावर असुन मोहाडी मुख्य रस्त्यापासून किलोमीटर हे गाव  या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठी खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
या दोन्ही गावांच्या मुख्य रस्त्यापासून दोन किलोमीटर रस्त्यावर गेल्या पंधरा वर्षांपासून कुठेही काम झालेले नाही. मुख्य रस्त्याला जोडणारा हा जवळचा मार्ग असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे अनेक नागरिकांना मणक्याचे आजार जडत आहेत. रुग्णांना दवाखान्यात याच रस्त्यावरून जावे लागते, तर विद्यार्थी मुलींना शाळेत जाण्यासाठी हाच रस्ता आहे. हा दोन्ही गावांचा मुख्य रस्ता असून, रोज या रस्त्याने गावाचे दळणवळण असते. विविध कामांसाठी जाण्यासाठी हा मुख्य रस्ता या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. याबाबत वाहनधारकांनी लोकप्रतिनिधीकडे वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांत संताप आहे.देखभाल दुरुस्ती अभावी जवखेडा ते मोहाडी रस्ता उखडून गेला आहे.पुलाची उंची वाढवा
जवखेडा खुर्द ते मोहाडी रस्त्यावर असलेल्या नदीच्या पुलाची उंची कमी आहे. दरवर्षी पावसाळ्यात नदीला पुर आल्यावर हा रस्ता बंद होतो. यामुळे रस्त्याचे काम पूर्ण करून नदीवरील पुलाची उंची वाढविण्याची मागणी जवखेडा खुर्द व मोहाडी येथील नागरीकांनी केली आहे.पिशोरला जाण्यासाठी हा आमचा मुख्य रस्ता आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे असून या रस्त्याने जात असताना खुप मोठी कसरत करावी लागते. या रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी मागणी आहे.आजिनाथ काचोळे, विठ्ठल काचोळे सचिन चोंदे ग्रामस्थ, जवखेडा.पिशोर हे बाजारपेठेचे गाव असून आम्हाला बाजारासाठी किंवा शेती साहित्य आणण्यासाठी व विविध कामासाठी याच रस्त्याने पिशोरला जावे लागते. खड्डेमय रस्त्यामुळे अपघात होण्याची भीती असते. या रस्त्याची दुरुस्ती करावी गावकऱ्यांची विनंती