३१ फुटी पाषाणाचे छत्रपती संभाजी नगरात जोरदार स्वागत
छत्रपति संभाजीनगर / चांदवड जवळ पूज्य राष्ट्रसंत आचार्य श्री देवनन्दिजी गुरुदेव यांच्या संकल्पनेतून भव्य णमोकार तीर्थ आकार घेत आहे.दि ६ ते १३ फेब्रुवारी २०२६ रोजी णमोकार तीर्थावर भव्य आंतराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सव होणार आहे. त्यानिमित्त जोरदार तयारी सुरु आहे.
तीर्थावर भगवान आदिनाथ भगवान भरत व भगवान बाहुबली यांच्यां भव्य ३१ फूट उंच प्रतिमा उभी केल्या जाणार आहे. त्यापैकी भगवान आदिनाथ यांची भव्य प्रतिमा उभी झालेली आहे. भगवान बाहुबली व भगवान भरत यांच्या प्रतिमेसाठी १०९ टन वजन असलेल्या ३१ फुट उंच २ शिला बैंगलुरु येथील खाणीतुन ट्रकने येत आहे. हा पाषाण बैंगलुरु येथुन १ एप्रिलला प्रवास करीत दि. १६ एप्रिल रोजी महाराष्ट्राच्या भूमीत सोलापुर येथे यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
तेथुन उस्मानाबाद, बीड, छत्रपती संभाजीनगर 31 फ़ीट प्रतिमा पाषाण चे छत्रपति संभाजी नगर एस क्लब आगमन झाले यावेळी समाज बांधव वतीने भव्य स्वागत व पूजन केले
सर्व प्रथम न्यायमूर्ती श्री कैलासचंदजी चाँदीवाल व पालकमंत्री संजय जी शिरसाट प्रतिमापाषाण वर स्वस्तिक काडुन पुष्प माला अर्पण केली या वेळी पालकमंत्री , श्री पंचायत अध्यक्ष महावीर जी पाटनी, श्री विकास जैन, श्री नंदू घोड़ेले श्री ललीत जी पाटनी श्री रविजी पहाड़े, श्री मनोजजी लोहाड़े सुर्यकुमार पहाडे यांन श्रीफल अर्पण केले सौ ज्योत्स्ना पहाड़े अर्घ चढ़ वुन पूजन केले
यावेळी . श्री विपिन कासलीवाल महेंद्र ठोले ऊपायक्ष महावीर गंगवाल मनोज सावजी मनोज दगड़ा जितेंद्र पाटनी देवेन्द्र काला सचिव प्रकाश अजमेरा प्रकाश कासलीवाल वैभव काला हेमंत गंगवाल शितल गंगवाल मनोज चांदिवाल प्रकाश ठोले सुनील कासलीवाल आरआर पहाड़े डॉ रमेश बड़जाते मुन्ना चांदिवाल डॉ जितेंद्र पहाड़े विनोद लोहाडे अमित कासलीवाल मयुर काला आंनद सेठी बापू कासलीवाल अरुण पाटणी यांचा सह हजारों भक्त उपस्थित होते अशी माहिती नरेंद्र अजमेरा पियुष कासलीवाल यानी दिली जिल्ह्यात ही ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले ,
या पाषाणाचे विशेष म्हणजे हे पाषाण काही दिवसात णमोकार तीर्थ येथे भरत व बाहुबली चे रूप घेणार आहे. भगवान आदिनाथांचे पुत्र भरत हे चक्रवर्ती होते, सहा खंडाचे राजा होता. त्यांच्या नावावरुनच आपल्या देशाला ‘भारत” नाव पडले आहे. तसेच भगवान बाहुबली हे वीर पराक्रमी होते. त्यांची श्रवणबेलगोला येथे जगप्रसिध्द ५२ फुट प्रतिमा आहे. त्यानंतर ही दोघांची सर्वात मोठी प्रतिमा ठरणार आहे. अशी माहिती णमोकार तीर्थाचे अध्यक्ष निलम अजमेरा यांनी दिली. फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या जागतिक महोत्सवामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक येणार आहे. नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळा अगोदर जैन समाजाचा हा महाकुंभ होणार आहे. . ही प्रतिमा दोन सख्या भावांची आहे. हे एकतेचे प्रतिक आहेअशी माहीती नरेंद्र अजमेरा पियुश कासलीवाल यानी दीली