जातीवादी मानसिकतेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा रिपब्लिकन सेनेची मागणी

0
28

जातीवादी मानसिकतेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा रिपब्लिकन सेनेची मागणी

 

आत्ताच एक्सप्रेस

गंगापूर/ प्रतिनिधी/ टाकळी कदिम तालुका गंगापूर येथील ग्रामसेवक, प्रशासक व तलाठी मॅडम यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राज्य शासनाचे आदेश असताना सुद्धा साजरी केली नाही त्यामुळे त्यांच्यावर राज्य शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी देशद्रोहाचा व जातीय मानसिकेतून जयंती साजरी न केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात यावे या मागणीचे निवेदन  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी  अंकित साहेब यांना भेटून सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले  . या सर्व प्रकरणात सी ओ यांनी सकारात्मकता दाखवत दोषींवर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. जर या दोषींवर कारवाई झाली नाही तर रिपब्लिकन सेना औरंगाबाद पश्चिम च्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन ,करण्यात येईल असा इशारा देण्यात आला याप्रसंगी  मिलिंद बनसोडे मराठवाडा अध्यक्ष,  बबन साठे जिल्हा महासचिव पश्चिम, सुनिल पांडे शहर उपप्रमुख,कुंदन मोरे तालुका सचिव, पश्चिम शेषराव दाने ज्येष्ठ नेते, योगेश दाणे जिल्हा संघटक, आदी उपस्थित होते