नांदागाव जुन महिन्यापुर्वी लगबगीने पुलाचे काम करण्याचा घाट…!
पुल बांधकाम व रस्त्याच्या डांबरीकरणच्या कामात भ्रष्टाचार
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव/ प्रतिनिधी /सोयगाव तालुक्यातील नांदागावत ता . सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर या आदिवासी बहुल लोकवस्ती भागात, सरकारच्या प्रमुख विभागा (पी डब्लू डी) मार्फत लोकहितासाठी योजना बनवून त्याची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली. विदर्भ व खान्देश, मराठवाडा ला नांदा गाव जोडण्यासाठी लाखो रूपयाच्या पुलाचे काम गेल्या महिन्यापासून हाती घेण्यात आले आहे, मात्र अधिकारी व गुप्तेदार संगनमताने गुणवत्ता पुर्ण काम करित नसुन गुप्तेदाराकडून पुलाच्या कामात आवश्यक ती काळजी घेत नासल्याने, ज्यामुळे पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे. परिणामी यंदा च्या पावसाळ्यात पुराच्या पाण्यात तग धरू शकणार नाही. जनतेच्या विविध टॅक्स रूपी शासनाकडे जमा झालेल्या निधीतून पुल बांधकाम हाती घेण्यात आले असून, काम गुणवत्ता पुर्ण व्हावे अशी अट परिसरातून पुढे येत आहे.
अजिंठा पर्वत रांगेतील डोंगराळ दऱ्या व्याप्त डोगराळ मागासलेल्या तालुक्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर अनेक विविध जनकल्याणकारी योजना राबवत असतात मात्र शासनातील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, गुप्तेदार गैरमार्गाने टक्केवारी घेत असल्याने गुणवत्ता पुर्ण कामाचा अभाव आहे. ” कुंपणच शेत खातं असल्याने ” वुक्ती प्रमाणे महत्वाचा दूवा असलेल्या पुलाचे बांधकाम अगदी निकृष्ट दर्जाचे राॅ मटेरियल चा वापर करून परराज्यातील मुकादम आणि मजुरांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याच्या गैरहजरीत जुन महिण्यापुर्वीच उरकण्याची लगीनघाई सुरू आहे.