बोडखा येथील अशोक जाधव यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान
बाजार/प्रतिनिधी/बाजार सावंगी  खुलताबाद तालुक्यातील बोडखा गावाचे माजी सरपंच अशोक सांडू जाधव यांना महाराष्ट्र रत्न सन्मान सोहळा वर्ष २०२५ या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातून व जिल्ह्यातून निवड झाल्याने त्यांना महाराष्ट्र रत्न पुरस्काराने नवी पेठ पुणे येथील पत्रकार भवनात शनिवारी (दि.१९) मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार सन्मानपत्र व मानचिन्ह देण्यात येऊन गौरविण्यात आले
लोककल्याणासाठी सदैव तत्पर नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य कला आणि विद्या शिक्षण क्रांतीचा केंद्रबिंदू आयोजित शाश्वत शेती मार्ग दर्शन कार्यशाळा व महाराष्ट्र रत्न सन्मान सोहळा यावेळी पार पडला
आय एफ एस अधिकारी डॉक्टर शेषराव हिम्मतराव पाटील चेअरमन ए आर जे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज श्री जितेंद्र तुळशीराम दाते व अध्यक्ष शब्द धन सोशल फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे प्राध्यापक मनोज शिवाजी वाकळे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येऊन गौरविण्यात आले
राज्यातून ग्रामीण भागातील एका व्यक्तीला हा बहुमान खुलताबाद तालुक्यातून मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून शुभेच्छांचा वर्षाव होऊन स्वागत केले जात आहे