दहिगाव येथील शिवाजी सतुके यांची धनगर समाज संघर्ष समिती जिल्हा अध्यक्षपदी निवड
कन्नड / प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील दहीगाव येथील पेशाने शिक्षक असलेले सामाजिक कार्यकर्ते शिवाजी बाबुराव सतुके यांची धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र, राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री डॉ.विकासजी महात्मे साहेब व प्रदेश अध्यक्ष श्री. अनंत बनसोडे, प्रदेश सचिव ज्ञानेश्वर गोटू परदेशी, अमन कुडगीर युवा प्रदेश अध्यक्ष, मराठवाडा युवा अध्यक्ष ईश्वरजी रामलाल पांढरे यांनी,ठाणे जिल्हा धनगर समाज संघर्ष समितीचे प्रसिद्धी प्रमुख गणेश विठ्ठल गढरी यांच्या शिफारसीनुसार केली आहे
मूळचे दहिगाव येथील रहिवासी असलेले शिवाजी सतुके सर यांनी आपले उच्च शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी या ठिकाणी विशेष श्रेणीत पूर्ण केले.त्यानंतर मां.सुरेश दादा पाटील विद्यालय जामडी जहांगीर.ता. कन्नड येथे माध्यमिक शिक्षक म्हणून आपले उत्कृष्ट कार्य ते करीत आहेत. उत्कृष्ठ पद्धतीने अध्यापनाचे कार्य करण्यासोबतच शिवाजी सर हे धनगर समाजाला अनुसूचित जमाती मध्ये (ST) आरक्षण मिळावे यासाठी सतत संघर्ष करीत आहेत. धनगर समाजासाठी कार्य करीत असतानाच, आपल्या दहिगाव आणि परिसरातील गावातील शेतकऱ्यांसाठी मोफत पिक विमा भरून देणे,अतिवृष्टी झाल्यास तत्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचा पंचनामा करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून देण्यासाठी विमा कंपनीकडे तक्रारी देणे,त्यांच्या पंचनामा करून देणे, पिक विमा आणि शासकीय नुकसान भरपाई अनुदान मिळवून देण्याचे कार्य मागील चार ते पाच वर्षापासून सतत निस्वार्थपणे मोफत करीत आहेत, सोबतच कोरोना काळात सुद्धा सरांनी गाव आणि परिसरातील लोकांना हिम्मत व धीर देण्याचे कार्य केले आहे, शासनाची लाडकी बहीण योजना, पी.एम. किसान योजना, कामगार कल्याण मंडळ योजना,विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध शिष्यवृत्ती योजना सर अगदी निशुल्कपणे अर्ज भरून देतात, गाव आणि परिसरातील प्रत्येक सामाजिक,धार्मिक, खेळ व क्रीडा, तसेच सांस्कृतिक कार्यात शिवाजी सतुके सर हे भाग घेतात आणि ते सामाजिक कार्य यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.. सरांच्या निस्वार्थ सामाजिक कार्याची दखल घेत दहिगावकर मंडळींनी त्यांना विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर बिनविरोध निवडून दिले आहे. विविध कार्यकारी सोसायटीमध्येही सर शेतकऱ्यांच्या कर्ज विषयक विविध समस्या सोडवण्यासाठी शासकीय पातळीवर सतत क्रियाशील असतात.
शिवाजी सतुके सर यांच्या अशा विविध अंगी अष्टपैलू सामाजिक कार्याची दखल घेत धनगर समाज संघर्ष समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे साहेब व मराठवाडा अध्यक्ष ईश्वरजी पांढरे साहेब यांनी त्यांना धनगर समाज संघर्ष समिती युवा जिल्हाअध्यक्ष छत्रपती संभाजी नगर या पदावर निवड केली.
धनगर समाजाचा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र होऊन धनगर समाजाचे आरक्षण एनटीतून एसटी या संवर्गात व्हावे, अधिक अधिक धनगर समाजातील तरुण मंडळींचा या आरक्षण लढ्यामध्ये सहभाग व्हावा या हेतूने हे पद देण्यात आले..
भविष्यकाळात धनगर समाजाचा संघर्षाचा हा लढा अधिक तीव्र करून,अधिकाधिक सामाजिक कार्य जिल्हाध्यक्ष शिवाजी सतुके यांचे परिसरातून कौतुक होत आहे