जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन मार्फत १५ एप्रिल ते ३० कालावधी जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा म्हणून घोषित
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव / प्रतिनिधी /
पाटबंधारे विभाग सिंचन शाखा सोयगाव व माध्यमिक विद्यालय वनगाव तालुका सोयगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जलव्यवस्थापनाबाबत कार्यक्रम घेण्यात आला.
गोंदेगाव लघु सिंचन प्रकल्पावरील शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यात आला व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्री पी एम पाटील यांनी ठिबक सिंचन व तुषार सिंचन या सूक्ष्म सिंचन पद्धती बाबत मार्गदर्शन केले व योग्य नियोजन केल्याने सिंचन क्षेत्रात वाढ होऊन उत्पादन वाढीस हातभार लागेल याबाबत माहिती दिली. याप्रसंगी संस्थाचालक डॉ. पी. एम. पाटील मुख्याध्यापक व्ही ए. परदेशी व शिक्षक वृंद तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते, पाटबंधारे विभागामार्फत सिंचन शाखा सोयगाव येथील कालवा निरीक्षक एस डी बारेला, व आर पी पाटील हे उपस्थित होते