फुलंब्रीचा देवगिरी सहकारी साखर सुरु करण्याची हालचाली,
आमदार अनुराधा चव्हाण यांचा पुढाकार
हजारो बेरोजगारांना रोजगार मिळण्याची आशा
फुलंब्री /प्रतिनिधी /फुलंब्री तालुका आणि परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला आणि तब्बल १४ वर्षांपासून बंद अवस्थेतील देवगिरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. कारखान्यावर असलेले कर्ज फेडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, पुढील २०२५-२६ च्या गाळप हंगामात कारखान्याचे बॉयलर पेटून साखर उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे कारखान्यावर अवलंबून असलेले कामगार तसेच परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
देवगिरी कारखाना सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला असून, कारखान्यावरील कर्ज फेडण्याची प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे कारखाना अवसायनातून बाहेर काढून गाळप हंगाम सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार अनुराधा चव्हाण यांनी दिली.
देवगिरी सहकारी साखर कारखान्याचा पहिला गाळप हंगाम १९९२-९३ मध्ये झाला होता. परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा एकमेव साखर कारखाना आहे. काही वर्षे कारखाना सुरळीतपणे चालला. मात्र, नंतर राजकीय हस्तक्षेप वाढून २०१०-११ मध्ये अखेरचा गाळप हंगाम होऊन कारखाना बंद पडला. आता दस्तुरखुद्द
आमदार अनुराधा चव्हाण यांनी स्वतः कारखाना सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. देवगिरी साखर कारखान्याची २१ एकर जमीन नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात गेली. त्यातून कारखान्याला २७ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यानंतर चौका घाटातील ४२ एकर जमीन विक्रीतून ७ कोटी ४० लाख, सावंगी शिवारातील १३२ एकर जमीन विक्रीतून ८४ कोटी रुपये मिळाले कारखान्याच्या गंगाजळीत जमा आहेत. एकूण १९५ एकर कारखान्याच्या जमीन विक्रीपोटी १२४ कोटी ६५ लाख रुपये कारखान्यास मिळाले असून, त्यातून कारखान्याने राज्य सहकारी बँकेचे ३६ कोटी ५५ लाख रुपयांचे कर्ज फेडण्यात आले आहे. ज्ञानेश्वर कारखान्याचे ८ कोटी ३८ लाख, समर्थ कारखान्याचे १० कोटी २० लाख रुपयाची देणीही अदा करण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदाचे १४ कोटी ८० लाख रुपयेसुद्धा अदा करण्यात आले
आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी थकलेले ५ कोटी ५० लाख, कर्मचाऱ्यांच्या पीएफपोटी ५ कोटी ५० लाख रुपये संबंधित कार्यालयांकडे भरण्यात आले असून, आता कारखान्याकडे १२ कोटी रुपये शिल्लक आहेत. या रकमेतून कारखाना सुरू करण्यात येणार आहे. आ. अनुराधा चव्हाण यांनी सांगितले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कारखाना कर्जमुक्त करण्याचा प्रस्ताव दिला आहे. लवकरच कारखाना अवसायनातून बाहेर निघेल आणि आगामी गाळप हंगाम सुरू होणार आहे
देवगिरी सहकारी साखर परिसरात विज नव्हती, विज सुरु करण्यात येईल
देवगिरी सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. त्यामुळे हा कारखाना सुरू करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न आपण करणार आहोत. कारखाना सुरू झाल्यानंतर शेतमजुरांच्या हातांना काम मिळेल. छोटे-मोठे अनेक उद्योग उभे राहतील. ज्यातून उपजीविकेची नवी साधने उपलब्ध होणार आहेत.
कारखान्याच्या माध्यमातून हजारो रोजगार निर्माण होतील. याशिवाय परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचीही मोठी सोय होणार आहे.
कारखान्याचे जे कर्ज बाकी आहे टप्याटप्याने फेडण्यात येत आहे.
– आमदार अनुराधा चव्हाण, फुलंब्री
देवगिरी सहकारी साखर सुरु झाल्यास फुलंब्री शहरात रोजगाराची संधी मिळेल
देवगिरी सहकारी साखर सुरु झाल्यास फुलंब्री शहर व तालुक्यात विकासाचे कामे होईल , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे, लवकरात लवकर देवगिरी सहकारी साखर सुरु होईल , तसेच परिसरातील नागरिकांना रोजगाराची संधी मिळेल, सरकार याबाबतीत सकारात्मक आहे.
औरंगाबाद जिल्हाध्यक्ष भाजपा तथा माजी नगराध्यक्ष फुलंब्री नगरपंचायत सुहास त्र्यंबकराव शिरसाठ