लासुर स्टेशन येथे महाशिवपुराण कथेचा आजचा सहावा दिवस भगवंताला तुमचे ह्रदय आवडते – पंडित राघव मिश्रा.

0
57
लासुर स्टेशन येथे महाशिवपुराण कथेचा आजचा सहावा दिवस भगवंताला तुमचे ह्रदय आवडते – पंडित राघव मिश्रा.
वैजापूर चे माजी नगराध्यक्ष बाळूशेठ संचेती, दिनेश परदेशी, विशाल संचेती यांच्या हस्ते महादेवाच्या आरतीने चौथ्या दिवसाच्या कथेची सांगता झाली…
दैनिक आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर / प्रतिनिधी / फिरोज मन्सुरी गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन  येथे आयोजित शिवमहापुराण कथेच्या चौथ्या दिवशी बोलतांना पंडित राघवजी मिश्रा म्हणाले कि,भगवंत जर पैशाने वस्तुने प्रसन्न झाले असते तर साधू संन्यासी भगवंताला प्रसन्न करण्यासाठी गुहेत डोंगरावर जाऊन त्यांची ध्यानधारणा करत बसले नसते. भगवंताला तुमचे हृदय आवडते हृदयातला भाव आवडतो.मनी नाही भाव अन देवा मला पाव असे होतं नाही.कर्मानुसार व्यक्तीला त्याचे फळ मिळत असते आपले कर्म चांगले असतील तर आपल्याला जीवनातच स्वर्गासारखे सुख मिळेल जर तुमचे कर्म वाईट असतील तर तुम्हाला नरक यातना मिळतील.ते इथेच बघावे लागतील. दान दिल्याने तुम्ही गरीब होत नाही.इतरांपुढे नतमस्तक झाल्याने तुम्ही कधीही लहान होत नाहीत.यावेळी त्यांनी दानवीर कर्नाची महिमा विशद केली. मनुष्याने अन्नदान व जलदान हे नेहमीच करावे. हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची या भजनावर भक्तांनी ठेका धरला.यावेळी परमानंदगिरी महाराज यांनी कथेला उपस्थिती दर्शवली व संत तुलसीदास महाराज संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या माध्यमातून भाविकांना उपदेश केला.आजच्या कथेची सांगता ही माजी नगराध्यक्ष बाळूशेठ संचेती, दिनेश परदेशी,विशाल संचेती यांच्या हस्ते महादेवाच्या आरतीने चौथ्या दिवसाच्या कथेची सांगता झाली.दिवसेंदिवस भावीकांची संख्या वाढत असून सुमारे सतरा ते अठरा हजार पेक्षा अधिक भावीक उपस्थित होते : आयोजक माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य गणेश व्यवहारे यांनी सर्वच बाबतीत योग्य नियोजन केल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.