श्री 1008 मुनिसुव्रतनाथ दिंगबर जैन मंदिर पैठण येथे वार्षिक यात्रा महामहोत्सवाचे आयोजन
छ. संभाजीनगर / प्रतिनिधी / 1008 शनिगृह अरिष्ट निवारक श्री 1008 मुनिसुव्रतनाथ दिंगबर जैन मंदिर पैठण येथे सालाबादाप्रमाणे दि.23 एप्रिल बुधवार रोजी वार्षिक यात्रा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
अंतर्मना आचार्य प्रसन्न सागरजी महाराज यांच्या आशिर्वादाने यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वार्षिक यात्रा महोत्सव प्रसंगी सर्व प्रथम सकाळी 8.00 वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ही शोभायात्रा मंदिर ते नाथमंदिर छ. शिवाजी महाराज पुतळा मार्गे मिश्रीलाल पहाडे जैनशाळा मार्गे मंदिरात विसर्जीत करण्यात येईल, यावेळी पुरुषांनी पांढरे वस्त्र परिधान करावे, तसेच महिलांनी केशरी व पिवळया रंगाच्या साड्या परिधान करव्यात. तसेच मंगल कळस घेऊन शोभायात्रेत यावे.
तदनंतर सकाळी 9.00 वा. बोलीया प्रारंभ होऊन भगवान मुनिसुव्रतनाथांचा पंचामृत अभिषेक पुजा सपन्न होईल. तदनंतर दुपारी 11.00 वाजता कैलासचंद किसनलाल काला, सौ. छाया, विशाल, मोनाली, काला परिवार आपेगांव वाला व भाऊसाहेब गुनधरराव धोंगडे, सौ. छाया भाऊसाहेब धोंगडे जालना यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे व दुपारी 1 वाजता मिटींग. तसेच संध्याकाळी 7.00 वा. भगवान मुनिसुव्रतनाथांची महाआरती, पाळणा, गोदभराई व महिला मंडळाच्या वतीने सांस्कतिक कार्यक्रमाचे होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल.
तरी समाजबांधवांनी वरील कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष महावीर बडजाते, महामंत्री विलास पहाडे, कोषाध्यक्ष विजय पापडीवाल, विश्वस्त प्रमोद कासलीवाल, जयकुमार बाकलीवाल, मनोज काला, प्रकाश कासलीवाल, कैलास पाटणी, किशोर भाकरे, सुमीत गंगवाल, डॉ. संजय गंगवाल, डॉ. राजेंद्र काला, स्वदेश पांडे, अभिजीत काला यांच्यासह समाजबांधवांनी केले असल्याची माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा व पियुष कासलीवाल यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.