स्थानिक गुन्हे शाखेकडून बैल चोरी करणारे आरोपी तिन दिवसात गजाआड
चोरी करतांना वापरलेल्या वाहनसहित तिन लाख साठ हजाराचा मुद्देमाल जमा
आत्ताच एक्सप्रेस
आडूळ/ प्रतिनिधी/पैठण तालुक्यातील अब्दुल्लापुर तांडा येथील शेतकऱ्याचे दोन बैल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून संबंधित दोन आरोपींनी बैलचोरी केल्याची कबुली दिली.त्यांच्याकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली अशोक लेलंड वाहन,मोबाईल,बैल विक्रीतून मिळालेली रक्कम असा एकूण ३ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त करून त्यांना पाचोड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पोलिसांनी सांगितले की दि १६ एप्रिल २०२५ रोजी पाचोड पोलीस ठाणे हद्दीतील अब्दुल्लापुर तांडा येथील शेतकरी मांगीलाल हुकुम राठोड यांनी गोठ्यातून दोन बैल चोरी गेल्याची फिर्याद पाचोड पोलीस ठाण्यात दिली होती.त्यानंतर संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ विनायकुमार राठोड यांनी याची दखल घेऊन जनावरे चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्याचे स्थानीक गुन्हे शाखेला आदेश दिले.त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ यांनी पथक तयार केले.गुप्त बातमीदार याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शेख नय्युम शेख कडू ( वय २८ ) रा.रांजणगाव दांडगा यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे साथीदार ज्ञानेश्वर हुकुमचंद राठोड ( वय २७ ) रा. अब्दुल्लापुर तांडा या दोघांनी बैल चोरून विक्री केल्याची कबुली दिली.या दोन्ही आरोपींना अटक करून पाचोड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.सदरची कारवाई गुन्हे शाखेचे पो नि सतिष वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सा पो नि पवन इंगळे,श्रीमंत भालेराव,लहु थोटे,खंदारे,धुमाळ,मगर,योगेश तरमाळे आदींनी केली.