Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादऐन उन्हाळ्यात पर्यटकांना गरम पाणी

ऐन उन्हाळ्यात पर्यटकांना गरम पाणी

ऐन उन्हाळ्यात पर्यटकांना गरम पाणी
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव / प्रतिनिधी / जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत पर्यटकांना पाणी पिण्यासाठी बसविण्यात आलेल्या पाच वॉटर कुलर पैकी तीन वॉटर कुलर बंद आहे. येथील नळांमधून गरम पाणी पुरवठा होत असल्याने अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना पिण्यायोग्य पाण्याचा शोध घेत लेणी परिसरात चौफेर भटकंती करीत फिरावे लागत आहे.
पर्यटकांमुळे भारतीय पुरातत्व विभागाला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते तरी येथील वॉटर कुलर बंद असल्याने थकून भागून पाणी पिण्यासाठी आलेले पर्यटक नळांना येणारे गरम पाणी बघून पाणी न पिताच माघारी फिरतांना दिसत आहे.
या वॉटर कुलर मधून अजिंठा लेणीतील लेणी क्रमांक ४, ८, १५, आणि २४ जवळ बसविण्यात आलेल्या नळाव्दारे पर्यटकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन दिले जाते.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. अजिंठा लेणीत वॉटर कूलरमध्ये सोडलेले पाणी पूर्णपणे गरम राहते. पाच वॉटर कुलर पैकी तिकीट बुकिंग ऑफिस जवळील एका वॉटर कुलरचा अपवाद वगळता उर्वरित तीन वॉटर कुलर बंद आहेत. येथील लेणी क्रमांक ,८, १५, आणि २४ जवळील नळामधून गरम पाणीपुरवठा होत आहे. हे गरम पाणी पिणे शक्य नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी पर्यटकांना लेणी परिसरात चौफेर भटकंती करावी लागत आहे.या पार्श्वभूमीवर भारतीय पुरातत्त्व विभागाने अजिंठा लेणी सफरीवर येणाऱ्या पर्यटकांना पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
         आम्ही अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलो होतो. शुल्क योग्यरित्या घेतले होते पण  पाणी पिण्यासाठी चांगले नाही.पाणी खूप गरम येत आहे.उन्हाळ्यात आपण इतके गरम पाणी कसे पिऊ शकतो?  तिकिटासाठी ४० रुपये आकारत आहेत आणि पर्यटकांना गरम पाणी देत ​​आहेत.हे युनेस्कोचे स्थळ आहे आणि येथील पाणी पिण्यासाठी गरम आहे.
      येथील पिण्याच्या पाण्याची सोय अजिबात चांगली नाही.नळातून येणारे पाणी खूप गरम आहे.उन्हाळा आहे. त्यात पिण्यासाठी थंड पाणी असावे.पण या लेणीतील पिण्यासाठी गरम पाणी उपलब्ध आहे.
     मी माझ्या कुटुंबासह अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलो आहे. उन खूप तेजस्वी आहे. खूप गरम आहे. माझ्याकडे असलेली पाण्याची बाटली होती पाणी संपले आहे.  येथील पाणी खूप गरम आहे.प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या ठिकाणी थंड पाण्याची व्यवस्था करावी.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments