एमआयडीसी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अवैध्य दारू जोमात तर पोलीस कोमात
छत्रपती साभाजीनगर/प्रतिनीधी/पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत येणाऱ्या मुख्यतः राहुलनगर,जायकवाडी बाजार तळ, पिंपळवाडी, (पि)जैन स्पिनर तसेच साखर कारखाना,गणेश नगर, ढोरकीन येथे मागील काही वर्षांपासून दिवसाढवळ्या खुलेआम अवैध्य देशी दारू विक्री व्यवसाय सुरू आहे. येथे दारू ढोसायला येणाऱ्या अल्पवयीन व वयस्कर तळीरामांनी तर पुरता हैदोस घातला आहे.आपआपसात होणारे सततचे भांडण व अश्लील भाषेत दिल्या जाणाऱ्या शिव्यांमुळे या परिसरातील नागरीक पुरते त्रस्त झाले आहे. परंतु या बीट चा कारभार पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या दारू विक्री करणाऱ्यांकडून चिरीमिरी मिळवण्याच्या लालसेने ही माहिती आपल्या वरिष्ठांपासून जाणून बुजुन लपवून ठेवली असल्याची चर्चा येथील नागरिकांमधुन होत आहे.
पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यातील बीट चा कारभार हाकणाऱ्या कारभाऱ्यांचा अवैध्य दारु विक्री करणाऱ्या सोबत असलेले छुपे आर्थिक मैत्रीपूर्ण संबंधामुळे मागील काही वर्षांपासून या पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम जागोजागी अवैध्य देशी दारू विक्री होतांना दिसत आहे. त्यातील मजूर कष्टकरी लोकांची मोठी वसाहत असलेल्या राहुलनगर मधे तर प्रवेश करताच बिट कारभाऱ्याच्या आशीर्वादामुळे अवैध्य दारू आड्डयाचे दर्शन होते.
त्या पाठोपाठ राहुलनगर शेजारील जायकवाडी आठवडे बाजार तळात तसेच नाथ सागर धरणाकडे जाणाऱ्या एका नमांकीत हॉटेलमध्ये चहा पाण्याच्या नावाखाली सर्रासपने दारू विक्री होते.या सोबतच संत एकनाथ कारखाना परिसरातील गणेश नगर, जैन स्पिनर, साखर कारखाना सामोरील ठिकाण आणि पिंपळवाडी पिराची या पुनर्वसित गावात मागील काही वर्षांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे म्हणा की बीट चा कारभार हाकनाऱ्याचे या लोकांसोबतच्या छुप्या दोस्तान्या मुळे खुलेआम अवैधरीत्या दारू विक्री होत आहे.
जर एखादया वर्तमानपत्रात या अवैध्य दारू आड्डयाबाबत एखादी बातमी प्रकाशित झाली तर पोलिसांकडून काही विशिष्ट लोकांवर किरकोळ कारवाई करून बाकीच्या लोकांना या कारवाईतून सुट देत कारवाई करण्याचें नाटक करन्यात येते.असी चर्चा या परिसरातील चहा पाण्याच्या टपऱ्या हॉटेलमधे होत आहे.
चौकट.
राहूलनगर, जायकवाडी बाजार तळ, पिंपळवाडी तसेच गणेश नगर,साखर कारखाना, ढोरकिन येथील अवैध्य दारू अड्ड्यावर दारू ढोसायला येणारे तळीराम सतत एकमेकास अश्लील भाषेत शिव्या तर देतातच त्यामुळे येथे कोणाचे ना कोणाचे भांडणे होत असतात परंतु पोलिसांकडून सदरील दारू अड्डे उध्वस्त करण्यासंबंधी कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या या कारभाराबाबत नागरिकांमधुन शंका उत्पन्न केल्या जात आहे.