लासुर स्टेशन येथे शिवमहापुराण कथेतून राघव मिश्रा यांनी दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश
दैनिक आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर /प्रतिनिधी /गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे आयोजित शिव महापुराण कथेच्या आजचा तिसरा दिवस होता.यावेळी राघव मिश्रा यांनी पुण्य कर्मासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावावे.एक छोटे रोपटे सांभाळून मोठे केल्याने आपले मागील जन्मातील पापकर्म मिटते. झाडे तोडल्याने तापमानात मोठी वाढ होतं आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षण हि आपली जवाबदारी आहे असे त्यांनी सांगितले. पुढे बोलतांना ते म्हणाले कि, जर आपण कोणा अंध अपंगाची थट्टा केली तर पुढील जन्म हि आपणास तसाच मिळतो. साधू,संत,मुलगी आणि सून यांच्यावर हसू नये. जसे तुमचे कर्म असते तसेच तुम्हाला फळ मिळते. या जन्मातंच एवढे पुण्यकर्म करा कि पुढचा जन्म तुम्हाला घेण्याची गरज पडणार नाही तुम्हाला मुक्ती मिळेल. यावेळी मिश्रा यांनी शंकर-पार्वती यांच्या विवाहाची आपल्या अमृतवाणीने संगीतमय पद्धतीने वर्णन केले.भगवान शंकराच्या वरातीचे वर्णन संगीतमय पद्धतीने केल्याने भाविकांनी ठेका धरला व शंकर-पार्वतीचा जयघोष केला.पार्वती हि कठीण प्रसंगी हि आपल्या पतीच्या बाजूने भक्कमपणे उभी होती म्हणून महिलांनी पार्वतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या पतीला त्याच्या कठीणकाळात साथ देण्याचे आवाहन केले. यावेळी मिश्रा यांनी दाक्षायणी देवीची आख्यायिका ही भाविकांना सांगितली.यावेळी सुमारे १५००० पेक्षा अधिक भावीक उपस्थित होते. दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत असल्याने आयोजक गणेश व्यवहारे यांनी समाधान व्यक्त केले.उद्योजक प्रितमकुमार मुथा,प्रतीक चंडालिया, सुनील वर्मा यांनी सप्तनीक महादेवाची आरती केली व आजच्या कथेची सांगता झाली