Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादजिल्ह्यातील टंचाईग्रस्त 158 गावात पाणी उपसा करण्यास बंदी

जिल्ह्यातील टंचाईग्रस्त 158 गावात पाणी उपसा करण्यास बंदी

जिल्ह्यातील टंचाईग्रस्त 158 गावात

पाणी उपसा करण्यास बंदी

जालना :– महाराष्ट्र भूजल पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनासाठी विनिमय अधिनियम-2009 अन्वये वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई भासणाऱ्या गावांचा अहवाल सादर केला असून त्यात जिल्ह्यातील एकुण 158 गावे टंचाईग्रस्त दर्शविली आहेत. तरी जालना जिल्ह्यातील टंचाईग्रस्त 158 गावात 30 जुन 2025 पर्यंत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या उदभवावर प्रतिकुल परिणाम करणाऱ्या विहिरीमधील पाणी उपसा करण्यास बंदी घालण्यात आली आहे,  असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

जिल्ह्यातील जालना तालुक्यातील 40, जाफ्राबाद तालुक्यातील 26, भोकरदन तालुक्यातील 54, बदनापूर तालुक्यातील 14 आणि अंबड तालुक्यातील 24 असे एकुण 158 गावांचा टंचाई भासणाऱ्या गावात समावेश करण्यात आलेला आहे. आदेशाचा भंग केल्यास महाराष्ट्र भूजल अधिनियम-2009 मधील तरतुदीनूसार योग्य ती दंडात्मक कार्यवाही करण्याचे अधिकार वापरण्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी व संबंधित तहसीलदारांना आदेशाद्वारे प्राधिकृत करण्यात आले आहे. तरी टंचाईग्रस्त गावात भूजल अधिनियम-2009 नुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.  असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments