शिल्लेगाव येथील दहावीच्या विद्यार्थ्यांचे तब्बल १८ वर्षानंतर गेट-टु -गेदर जुन्या आठवणीला दिला उजाळा

0
59
शिल्लेगाव येथील दहावीच्या विद्यार्थ्यांचे तब्बल १८ वर्षानंतर गेट-टु -गेदर जुन्या आठवणीला दिला उजाळा
दैनिक आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर /प्रतिनिधी/ फिरोज मन्सुरी गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव येथील लोकनेते साहेबराव पा डोणगावकर माध्यमिक विद्यालयात शिकणारे विद्यार्थी तब्बल १८ वर्षानंतर एकामेकाला भेटले एकमेकाला बघितल्यानंतर एकच सूर निघाला और कैसे हो.. मेरे यारो… असे म्हणत जुनी आठवणीला उजाळा दिला दरम्यान सन २००६ – २००७ या वर्षातील १० वी चे विद्यार्थी पुन्हा एकदा जमले. निमित्त होते स्नेह मेळाव्याचे. रविवार १३ एप्रिल चा दिवस उजाडला शाळेत जाण्याच्या हुरहुरीने.. दहावीचा वर्ग पुन्हा भरणार होता. या स्नेह मेळाव्याला प्राधान्य दिले. आपले गुरुजी दुसऱ्या शहरात आहे, असे कळल्यानंतर त्यांना आणायची धांदल उडते. वर्गातील   आसपास राहणारे वर्गमित्र इतर मित्रांचे फोन नंबर शोधतात. घरच्या कार्यक्रमाचे निमंत्रण जेवढ्या आग्रहाने करतात, तेवढ्या आग्रहाने सर्वांना निमंत्रण दिल्या जाते. आणि १३ तारखेला सकाळी अकरा वाजता  वर्ग पुन्हा भरतो. प्रार्थना होते. शिक्षकवृंद आणि विद्यार्थी प्रार्थना करून वर्गात जातात. स्व-ागत समारंभ होतो, सोबत नसलेले विद्यार्थी व गुरुजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली आर्पण केल्याजाते. त्यानंतर मनोगते व्यक्त केल्या जाते सारेजण भूतकाळातील त्या रम्य दिवसात पुन्हा एकदा सर्व जण रमतात. पन्नाशीतील हे विद्यार्थी सुरूवातीला एकमेकांना ओळखूसुद्धा येत नव्हते पण नंतर गप्पा एवढ्या रंगतात की कधी संध्याकाळ झाली ते कळलेच नाही. यावेळी लहू हिवाळे प्रवीण बडोगे सतीश दळे गणेश राऊत योगेश बोराडे निवृत्ती जाधव बाळासाहेब कुकलारे आजिनाथ नरोडे राहुल राऊत रवी नरोडे गणेश नरोडे कल्याण नरोडे अजय पवार श्याम आवताडे संदीप औताडे बाळू औताडे  शिवव्याख्याते संदीप औताडे अविनाश गव्हाणे योगेश पोपळघट गणेश बोराडे बाबासाहेब बोराडे प्रवीण बावरे साईनाथ जगताप ज्ञानेश्वर भुसारे गणेश भुसारे कृष्ण भुसारे किशोर वाघ संदीप बोर्डे सदाशिव वाघ सदाशिव नरोडे ज्ञानेश्वर खेडकर बाळासाहेब चव्हाण भाऊराव  तिवाडे गणेश तिवाडे भाऊसाहेब खेडकर संतोष खेडकर विजय खेडकर नवनाथ खेडकर नवनाथ भुसारे किशोर घिठरे संतोष आहेर  संदीप भुसारे ज्ञानेश्वर त्रिभुवन कलीम पठाण वाजिद पठाण रियाज बेग शोएब शेख असलम शेख दादासाहेब गवळी नितीन मुलताने  अर्जुन गव्हाणे  साईनाथ नवले