केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा जिल्हा दौरा
छत्रपती संभाजीनगर – केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे शुक्रवार दि.१८ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्याचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शुक्रवार दि.१८ रोजी दुपारी साडेचार वा. छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे विशेष विमानाने आगमन व हॉटेल रामा कडे प्रयाण, दुपारी ४ वा. ५५ मि. नी. हॉटेल रामा येथून सिडको कॅनॉट प्लेस कडे प्रयाण, सायं.५ वा. शूरवीर महाराणा प्रताप यांच्या पुतळा अनावरण सोहळ्यास उपस्थिती, सायं.६ वा. कॅनॉट प्लेस येथून हॉटेल रामाकडे रवाना, सायं. सव्वा सहा वा. हॉटेल रामा येथे उद्योजकांशी संवाद, सायं.६ वा. ५५ मि. नी. हॉटेल रामा येथून विमानतळाकडे प्रयाण, सायं. ७ वा. ५ मि. नी. विशेष विमानाने लखनऊ कडे रवाना.


