Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादविचारांची मिरवणूक, एकतेचा जयघोष – वेरूळमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी.

विचारांची मिरवणूक, एकतेचा जयघोष – वेरूळमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी.

विचारांची मिरवणूक, एकतेचा जयघोष – वेरूळमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी.

खुलताबाद/ प्रतिनिधी/खुलताबाद तालुक्यातील वेरूळ  येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती सोमवारी उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी माजी. सरपंच प्रकाश पाटील मिसाळ,ग्रामपंचायत उपसरपंच विजय राठोड, किशोर काळे, महामाया बुद्ध विहाराचे अध्यक्ष विनोद ढिवरे,  साहेबराव पांडव, कारभारी ढिवरे,माजी  उपसभापती विजय भालेराव वेरूळ गावाचे पोलीस पाटील रमेश ढिवरे,पोलीस कर्मचारी  प्रमोद साळवे,तसेच ग्रामपंचायत सदस्य चंदू राठोड, शेख मसीयोद्दीन,राहुल निकुंभ,मिलिंद जाधव, कडूबा साळवे,हितेश ठाकरे,राजेश आडे, दिनेश श्रीसुंदर, साईनाथ लोखंडे,धीरज ढिवरे यांचे सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
सायंकाळी सहा वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह सजवलेल्या रथातून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली.मुख्य भोसले चौकात भगव्या ध्वजास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.जय भीम,जय भारत अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. फटाक्यांची आतिषबा जी करत संपूर्ण परिसरात उत्सवमूर्ती वातावरण निर्माण झाले.या मिरवणुकीत  नव तरुणांच्या हाती असलेल्या फलक  मध् डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह इतर महापुरुषांचे विचार प्रदर्शित करण्यात आले होते. त्यामध्ये भारतीय समाजात एकात्मता, बंधुभाव आणि अखंडतेचा संदेश झळकत होता. भीमगीतांवर अनेक तरुण तरुणी ठेका धरले होते  प्रेरणादायी गीतांवर वेरूळ ग्रामस्थ, महिला वर्ग आणि लहान मुले आनंदाने नाचत सहभागी झाले.या प्रसंगी संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिरवणुकीच्या मार्गावर अनेक ठिकाणी समाजबांधवांनी थंड पाण्याची व शरबत वाटपाची व्यवस्था केली होती.

विशेष म्हणजे 14 एप्रिल ची रोजी वेरूळ गावात दोन व्यक्तीच्या अचानक मृत्यू झाली होती अल्पशा आजाराने निधन झालेले  एकनाथ शिरसाट व विजेचे धक्का लागून  अपघातात मृत्यूमुखी पडलेले संतोष आधाने यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले होते
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments