सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथे भीषण पाणी टंचाई .

0
35
सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथे भीषण पाणी टंचाई .
प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष…!
सावळदबारा येथून हाकेच्या अंतरावर वरिल पळासखेडा ता. सोयगाव येथील आदिवासी समाजाची मार्च महिन्यात भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्या साठी भटकंती सुरू झाली असून पोटावर हातमजुरी करणाऱ्या महिला – वृध्द काम धंदा सोडून हंडाभर पाण्यासठी वनवण भटकावे लागत आहे.
अखेर संतप्त होत पाण्यासाठी आदिवासी  समाजाच्या महिला पुरुषांनी व समाज बांधवांनी  ग्रामपंचायत कार्यालयावर  हंडा मोर्चा  काढून प्रशासनाचा निषेध व्यक्त केले आहे.
सरपंच व ग्रामसेवक  गावातील पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे.जल जीवन योजने चे ही वाजले तीन तेरा वाजले आहज. या योजनेचे इंजिनिअर, ठेकेदार घेत आहे घरीच झोपा योजना  धुळखात अपूर्ण अवस्थेत पडून.टिटवी,पळसखेडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत दोन वर्षांपासुन जल जीवन मिशन योजनेचे काम अर्धवट अवस्थेत धूळ खात पडून आहे हे काम फक्त कागदावरती पैसा काढण्यासाठी च झाले आहे, तसेच या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप असून या जल जीवन योजने चे ठेकेदार आणि इंजिनियर यांनी मिलीभगत करून या योजनेचे पूर्णपणे तीन तेरा वाजविले आहेत . जल जीवन योजने ची जी विहीर आहे या विहिरीचे पाणी गावातील स्वयं घोषित पुढारी हे त्यांच्या शेतमालासाठी सर्रास पणे वापर करत असल्या मुळे ही पाणी टंचाई भासत असल्याचे सांगण्यात आले मात्र ग्रामपंचायत सदस्य. सरपंच, उप सरपंच, ग्रामसेवक  इंजिनियर, ठेकेदार यांच्या दुर्लक्षमुळे व बेजबाबदार पणामुळे पळसखेडा येथील आदिवासी समाज पाण्यासाठी लांब लांब भटकंती करीत आहे अनेक वेळेस पळसखेडा येथील आदिवासी समाज बांधवांनी ग्रामसेवक, सरपंच, यांना वारण वार सांगून ही दखल घेतली नसल्या मुळे पळसखेडा येथील महिला, पुरुष, छोटे लहान मुलं यांनी ग्रामपंचायत वरती हंडा मोर्चा काढला पळसखेडा हे गाव शंभर टक्के आदिवासी गाव आहे  हे गाव अजिंठा डोंगर दऱ्यांमधे बसलेले गाव आहे या परिसरात अनेक हिंसक वन्य प्राणी आढळून येतात
पिण्याच्या पाण्यात साठी येथील आदिवासी समाजाचे अपंग. व्यक्ती, लहान चीमुकले मुलं महिला भगिनी व पुरुष  बांधव सतत डोंगर दऱ्यान मधे रात्री बेरात्री अंधारामध्ये  स्वतःचा जीव धोक्यात टाकून मैलो मैली पाण्यासाठी भटकंती करीत आहे
मात्र प्रशासन हे बेजबाबदार पणे वागत आहे जल जीवन योजने चा नेमका पैसा गेला कुठं याची ही चौकशी करून या दोशीन वरती कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थान कडून होत आहे.