जागृत दक्षिणमुखी घनतृप हनुमान मंदिर बारागाड्याचा कार्यक्रम उत्साहात
मारोती विठ्ठल सुरसे यांचा सत्कार
जालना/प्रतिनिधी/जालना येथील आराध्य दैवत रामनगरातील जागृत घनतृप दक्षिणमुखी हनुमान मंदिरात 112 वर्षाची परंपरा कायम राखत यावर्षीही 12 एप्रिल रोजी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.
सायंकाळी 5 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत हा धार्मीक कार्यक्रम सुरू होता. यावेळी अनेकांनी आपले नवस पुर्ण केले. या उत्सवासाठी अध्यक्ष उत्सव समितीचे अध्यक्ष बाबासाहेब वानखेडे यांच्यासह रामेश्वर सुरसे, भगवान गाडेकर, हरिभाऊ वानखेडे, सिताराम रोडगे, रामदास गोरे, कृष्णा वानखेडे, बाबासाहेब सोनवणे, निलेश वानखेडे,नितीन तायडे, भगवान येवले, गणेश सोमधाने, बाबुराव मामा सतकर, शिवलाल घाडगे आदिंसह भाविक भक्तांची उपस्थिती होती.
जालना शहर वाहतूक शाखा व सदर बाजार पोलिसांनी मोठा बंदोबस्त होता. यावेळी हजारो भाविकांनी घनतृप दक्षिणमुखी श्री हनुमानाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी बारा गाड्यासाठी 11 हजाराची देणगी देणाऱ्या मारोती विठ्ठल सुरसे यांचा समितीच्या वतीने प्रमाणपत्र व नारळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला
