भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने खुलताबाद येथे पत्रकारांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले

0
49
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने खुलताबाद येथे पत्रकारांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले
सावंगी /प्रतिनिधी/बाजार सावंगी खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथील दैनिक सकाळचे बातमीदार श्रीधर पाटील यांना छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खुलताबाद तालुक्यातून आदर्श व्यक्तिमत्व पुरस्काराने सोमवार(दि.१४) दुपारी खुलताबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील सभा मंचावर त्यांच्या जयंतीदिनी सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले
तालुका समिती अध्यक्ष वसंता शिरसाठ प्रतिनिधी सुधाकर जेठे आयटी इंजिनिअर नुपूर विशाल शिरसाठ सुनील मरकड श्रीकांत कुलकर्णी नईम शहा शेख जमीर किशोर सुनील घोडके यांच्या उपस्थितीत व समितीद्वारे गौरव करण्यात आला
तालुक्यातील विश्वरत्न डॉ: बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वर्ष २०२५ सन्मान सेवेचा गौरव कर्तुत्वाचा चौथा स्तंभ पत्रकार संघर्ष समितीतर्फे तसेच शासकीय निमशासकीय व शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कर्तृत्वाचा गौरवार्थ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला समितीतर्फे तालुक्यातून अनेकांना पुरस्काराने गौरविण्यात आले बाजार सावंगी येथील रामेश्वर नलावडे,चांदखा पठाण  हरिदास सराटे,यांचाही समावेश आहे
तालुक्यातून दैनिक सकाळ बातमीदार म्हणून बहुमान मिळाल्याने त्यांचे अभिनंदन करून अनेकांनी शुभेच्छा दिल्या