Saturday, October 25, 2025
HomeUncategorizedमहावीर भवनातील  प्रश्नमंच स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद 

महावीर भवनातील  प्रश्नमंच स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद 

महावीर भवनातील  प्रश्नमंच स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद 
भ.महावीर जन्म कल्याणक  महिला समिती अंतर्गत भ. महावीर भवन येथे झालेल्या आदर्श, लब्धी, वर्धमान, गुरु गणेश, सुशील, प्रभा किरण, नवकार आदी स्थानकवासी महिला तसेच  बहु मंडळातर्फे धार्मिक – सामान्यज्ञान प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. यात 80 स्पर्धकांनी सहभाग नोंदवीला.
    प्रश्नमंच स्पर्धेमध्ये भ. महावीर जीवनकार्य, पौराणिक, राजकिय ,सामाजिक, जागतिक घडामोडी आदी विषयांवर विविध प्रश्न विचारले होते.
    स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी भारती बागरेचा, पुष्पा बाफना, डिंपल पगारिया, कलाबाई आचलिया, डॉ. निर्मला मुथा, वंदना डोशी, रूपाली कुंकूलोळ आदींनी परिश्रम घेतले.
    सूत्रसंचालन मंगल पारख यांनी केले. भावना सेठिया,साधना शहा,नीता गादिया, पल्लवी शहा आदींनी सहकार्य केले.
    प्रारंभी भारती बागरेचा, स्वप्नील पारख, मिठालाल कांकरिया,झुंबरलाल पगारिया, कौशिक सुराणा, संगीता संचेती, सारिका साहुजी, करूना साहुजी  मनीषा भन्साळी, सविता लोढा,मधु जैन,तनुजा गांधी, मेघा सुगंधी,  प्रतीक साहूजी, पंकज साकला, बाहुबली वायकोस आदींच्या उपस्थितीत उदघाटन झाले. अशी माहिती स्पर्धा प्रसिद्धीप्रमुख प्रशांत शहा नरेंद्र अजमेरा पियुष कासलीवाल यांनी दिली.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments