बाजार सावंगी येथील जिल्हा परिषद प्रशालेचे विद्यार्थी 27 वर्षांनी आले एकत्र उत्साहात स्नेहसंमेलन
सावंगी /प्रतिनिधी/बाजार सावंगी -खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथील जिल्हा परिषद प्रशालेचे १९९८ व्या वर्षी दहावी त शिकणारे विद्यार्थी २७ वर्षानंतर रविवारी (दि.१३) स्नेहपूर्ण वातावरणात एकत्र आले
परस्परांच्या विचारांच्या देवाण-घेवाणीतून अनुभवातून दिवसभर तत्कालीन शालेय जीवनाचा खेळीमेळीच्या वातावरणात आठवणींना उजाळा देत स्वतःचे कार्य अनुभवांचा आनंद लुटत मैत्री म्हणजे एक आधार एक विश्वास एक आपुलकी आणि अनमोल साथ अशा शब्दात संपूर्ण दिवस शालेय प्रांगणात कापडी मंडपाची उभारणी करून आनंद लुटला
तत्कालीन गुरुवर्याबद्दल स्नेह मिलना सह गुरुजन कृतज्ञता पार पडली कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय गीत जनगणमन गायनाने होऊन घोषणांचा जयघोष झाला
मान्यवरांच्या हस्ते श्री सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त जेष्ठ शिक्षक श्रीधर पाटील हे होते डी डी काळे श्री आघाडे यांची उपस्थिती होती त्यावर्षी दहावीच्या तीन तुकड्यातील दीडशे विद्यार्थ्यांपैकी सव्वाशे विद्यार्थी व विद्यार्थिनी सहकुटुंबासह उपस्थित होते बाजार सावंगी सह रेल येसगाव ताजनापूर जैतखेडा शेखपुर सोबलगाव पाडळी इंदापूर कानडगाव कनकशीळ अशा 20 गावातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती
शिक्षक व मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले दिवंगत शिक्षक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली सोशल मीडियाच्या माध्यमातून खाजा खान पठाण संतोष नलावडे रमेश नलावडे बाळू नलावडे रेवती पाडळकर बाबासाहेब नलावडे व बाबासाहेब बोरसे या विद्यार्थ्यांनी सर्वांना एकत्रित आणले
उपस्थित मधील आज संपूर्ण राज्यभरात प्रार्थमिक व माध्यमिक शिक्षक विद्युत मंडळ युवा उद्योजक ग्राम विकास अधिकारी महिला आयटी इंजिनियर विविध कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या नोकऱ्या राजकीय कार्यकर्ते कृषी दुकान मालक मेडिकल विक्री निवृत्त सैनिक दुग्ध व्यवसायिक व अन्य दुकानदार अशा पदांवर कार्यरत असून सर्वांनी आपापले विचार ऐकवीत सर्व भारावले
काहींनी दुःखद अनुभव तर अनेकांनी सुखद अनुभवातून मैत्री टिकवणे गरजेचे सांगितले
प्रत्येकाने कौटुंबिक परिचय व आपापले अनुभव कथन केले सायंकाळी सर्वांना पाच वाजता स्नेहभोजन अजून निरोप समारंभ झाला सूत्रसंचालन खाजा खान पठाण यांनी करून आभार संतोष नलावडे यांनी मांडले