आदर्श वाकी येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता मनाला भक्ती मार्गाच्या आवड लावा ह भ प विजयकुमार फड
कन्नड तालुका/ प्रतिनिधी/कन्नड तालुक्यातील आदर्श वाकी येथील अखंड हरीनाम सप्ताह सांगता प्रसंगी संशय सोडून भक्ती करा. जो संशयाने घेरला त्याच्या.नाशाला काळजीने उडी घातलीच समजा. यासाठी निःसंशय वृत्ती मिळवा. आपल्या बोलण्यातून कोणी दुखावल्या जाणार नाही, याची काळजी घ्या. एक वेळ हाताने पेटवलेले विझविता येईल. पण मुखातून गेलेले शब्द विझविता येत नाही. कोणतीही गोष्ट करताना डोक्यात नाही तर मनात धरा.. मनाशी मैत्री करा. मनाचा एक गुण खूप चांगला आहे. त्याला ज्या विषयाची गोडी एकदा लागली तो विषय मग ते काही झाले तरी सोडीत नाही म्हणून त्याला भक्तिमार्गाची आवड लावा. देव प्रेमाचा भुकेला आहे हो, तुम्ही मनापासून प्रेम द्या, तुमच्या हाकेला ओ देण्यास ईश्वर तत्पर असतो, असे डॉ. विजयकुमार फड यांनी सांगितले. आदर्श गाव वाकी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वाकी येथे दक्षिणमुखी हनुमान जन्मोत्सवनिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून, सात दिवस चालणाऱ्या सप्ताहात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, विविध कीर्तनकारांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. डॉ. विजयकुमार फड सप्ताहाचे पाचवे पुष्प गुंफताना म्हणाले की, अभिमानी माणूस जीवनात कधीच सुखी रहात नाही, अभिमान बाळगू नका. अभिमान हा सर्व दुःखाचे चिंतेचे व्यापाचे व संतापाचे मूळ आहे. यासाठी प्रथम त्याचा त्याग करा, आपल्या जीवनात अनुभवास येणारे सुखदुःख हे प्रारब्धाधीन आहे, हे लक्षात ठेवून नेहमी आनंदी रहा. विकासाकडे वाटचाल करणाऱ्या वाकी गावाने आपल्या गावाचा आदर्शपणा कायम जोपासत अध्यात्माच्या या कार्यक्रमातून वृक्षलागवडीचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी पिशोर पोलीस ठाण्याचे सपोनि शिवाजी नागवे, ग्रामपंचायत अधिकारी सुनील अकोलकर, तलाठी एस. के. काथार, कृषी सहायक अमोल राठोड, शिवदास जंजाळ यांनी शोभीवंत रोपे भेट दिली. रोपांची लागवड व संगोपनाची जबाबदारी ग्रामस्थांनी घेतली आहे.व नंतर महाप्रसाद लाभ गेतला
