Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादआंधळकर हायस्कूलच्या विद्यार्थांचे एन.एम.एम.एस. स्पर्धा परीक्षेत सुयश 

आंधळकर हायस्कूलच्या विद्यार्थांचे एन.एम.एम.एस. स्पर्धा परीक्षेत सुयश 

आंधळकर हायस्कूलच्या विद्यार्थांचे एन.एम.एम.एस. स्पर्धा परीक्षेत सुयश 
इस्लामपूर /प्रतिनिधी/आंधळी येथील श्री दत्त एज्युकेशन सोसायटी अंकलखोप संचलित*हिंदकेसरी गणपतराव आंधळकर हायस्कूल आंधळीतील इ.8 वी मधील  पवित्रा तानाजी माने (96गुण),तनिष्का राजू माने(83गुण),श्रीहरी महेश जाधव(74गुण) व अविष्कार गजानन तोडके(72गुण) या विद्यार्थांनी उत्तीर्ण होऊन एन.एम.एम.एस.स्पर्धा परीक्षेत सारथी शिष्यवृत्ती वार्षिक प्रत्येकी 38400 रुपये पटकाविली व विद्यालयात अनुक्रमे प्रथम,द्वितीय,तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केले.तसेच एन.एस.एस.ई.,हिंदी परीक्षा व इलिमेंटरी- इंटरमिजिएट  परीक्षांचा ही 100% निकाल लागला.त्यांना धिरज बंडगर, अमर पाटील, रमेश गायकवाड,मंगेश माने,उज्वला गुरव,सोनल कांबळे तसेच मुख्याध्यापक जयवंत मोहिते यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.या उज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष उदयसिंह पाटील सचिव नरेंद्र पाटील व यशवंत माने यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन गौरविले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments