पिशोर येथे युवकांची गळफास घेऊन आत्महत्या
कन्नड ग्रामीण/ प्रतिनिधी/कन्नड तालुक्यातील पिशोर येथील वाघुळखेडा शिवारातील एका शेतात चिकूच्या झाडाला गळफास लावून शुक्रवारी (दि ११)युवकाने आत्महत्या केली
याबाबत अधिक माहिती अशी की नातेवाईकाकडे हेअर सलून मध्ये कामासाठी आलेल्या व गेल्या दोन वर्षापासून पिशोर येथे राहणाऱ्या चंद्रकांत भाऊसाहेब बनकर वय २६ रा नरला भावडी त्या फुलंब्री याने शेषराव ढगे यांच्या वाघुळखेडा शिवारातील गट क्रमांक ६० मधील चिकूच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला
त्यास ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल गिरी यांनी तपासून मृत घोषित केले पिशोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून
अधिक तपास जमादार वसंत पाटील करीत आहेत