भद्रा मारोती मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात, काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता, पाच लाख भाविकांची
खुलताबाद /प्रतिनिधी/ खुलताबाद लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खुलताबाद येथील श्री भद्रा मारोतीच्या दर्शनासाठी हनुमान जयंती निमित्त दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती, राज्याच्या कान्यकोपऱ्यातून आलेल्या भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला होता,पवन पुत्र की जय, हनुमान की जय यासह जय भद्राच्या नामघोषात लाखो भाविकांनी भद्रा मारुतीचे दर्शन घेतले असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे यांनी दिली. शनिवारी
रोजी पहाटे चार वाजता अभिषेक व महापुजा या नंतर सकाळी सहा वाजेच्या सुमारास भद्रा मारुती मंदिर
संस्थानचे सचिव राज्याचे मंत्री अतुल सावे,संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पाटील बारगळ.
उपाध्यक्ष रामनाथ बारगळ,सहसचिव खंडेराव बारगळ, विश्वस्त-चंद्रकांत खैरे, कचरू बारगळ, कुलभूषण अग्रवाल, कार्याध्यक्ष किशोर अग्रवाल.ज्ञानेश्वर बारगळ बारगळ,यांच्या हस्ते झाली यावेळी जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे यांच्यासह संस्थानचे सर्व पदाधिकारी व हनुमान भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
हनुमान जयंतीनिमित शुक्रवारी सायंकाळ पासून औरंगाबाद, फुलंब्री,वेरुळ,कन्नड महामार्गासह खेड्या पाड्यातून मोठया प्रमाणात भाविक भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी खुलताबाद नगरीत दाखल होण्यास सुरुवात झाली होती.या मध्ये औरंगाबाद परिसरातून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय होती.
हनुमान जयंती निमित्त शुक्रवारी सायंकाळ पासूनच भाविकांचे जथेच्या जथे पायी दिंड्या,पालख्यासह हातात पताका,मशाल घेऊन जय भद्राचा नामघोष करीत खुलताबाद शहरात येण्यास प्रारंभ झाला होता, हनुमान जन्मोत्सवामुळे खुलताबाद शहराकडे येणारे सर्व रस्ते भाविक भक्तांच्या गर्दीने फुलून गेल्याचेे चित्र पाहावयास मिळत होते,शहरात दाखल होताच भाविक श्री भद्रा मारोती चरणी नतमस्तक होत होते,या वर्षी हनुमान जन्मोत्सवासाठी औरंगाबाद कडून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. त्या मुळे महामार्गावर अनेक ठिकाणी भाविकांसाठी चहा पाणी व फराळाची व्यवस्था भक्तांनी केली होती,तसेच औरंगाबाद परिसरातून पायी येणारे भाविक दौलताबाद घाट चढताना घाटातील डोंगर पाऊलवाटेचा वापर करत असल्याने या ठिकाणी भाविकांना चढण्यासाठी सोपे जावे म्हणून लांब दोरखंड व लाईटची व्यवस्था करण्यात आली होती.जेणे करून भाविकांना चढण चढताना त्रास होणार नाही. शनिवारी पहाटे चार वाजता भद्रा मारुतीचे मूर्तीस प्रथम पवित्र जलाने ब्राम्हवृदांच्या मंत्रोचारात जलाअभिषेक व शाहीस्नान घालण्यात आले,तदनंतर भद्रा मारुती मुर्तीची आकर्षक सजावट सुभाष धुळे. बाळू काळे व भक्तगणांनी भद्रा मारुती मुर्तीला वस्त्र व पगडी घालून फुल,हार यांनी आकर्षक सजवण्यात आली होती,या मुळे भद्रा मारुतीची मूर्ती अधिकच सुंदर दिसून येत होती.श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्या निमित्त भद्रा मारुती संस्थांनच्या वतीने दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी अखंड हरिनाम साप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते,या अखंड हरिनाम सप्ताहा दरम्यान दररोज दुपारी संगीतमय तुलसी रामायण, हरिपाठ भाजन, यासह रात्री कीर्तन विविध कार्यक्रम झाले तर सप्ताहाची सांगता शनिवारी रोजी महंत रामगिरी महाराज सरलाबेट यांचे काल्याचे कीर्तन होऊन महा प्रसादाचे वाटप भाविकांना करण्यात आले. भाविकांना दर्शनासाठी कुठला ही प्रकारची असुविधा होऊ नये या साठी संस्थानच्या वतीने बॅरिकेड्स लावण्यात आले होते व सावली साठी भव्य मंडप उभारण्यात आला होता. तसेच स्पेशल दर्शनाची हि व्यवस्था करण्यात आली होती. उन्हाळ्याचे दिवस असल्याने ठिक ठिकाणी पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती तसेच मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी फराळची हि सोया करण्यात आली होती, अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी पथक व रुग्णवाहिका हि सज्ज ठेवण्यात आली,होती मंदिर परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडूनये यासाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर होती,
औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड व अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या अधिपत्याखाली. उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा चोख पोलीस बंदोबस्त मंदिर परिसरात तैनात केला होता,या मध्ये पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच संस्थांच्या वतीने ही खाजगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते.
स्मार्ट सिटी बस व
एस टी महामंडळाच्या वतीने विविध मार्गा वरून भाविकांच्या सोयीसाठी जादा बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारे असुविधेचा सामना करावा लागू नये यासाठी संस्थांच्या वतीने सर्वोतोपरी काळजी घेण्यात आली होती.
