Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादजालना जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी तालुकानिहाय सरपंच पदाची आरक्षण अधिसूचना जारी

जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी तालुकानिहाय सरपंच पदाची आरक्षण अधिसूचना जारी

जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी तालुकानिहाय सरपंच पदाची आरक्षण अधिसूचना जारी

जालना : यापूर्वी प्रसिध्द केलेल्या सर्व अधिसूचना अधिक्रमीत करुन अधिसूचना दि. 05 मार्च, 2025 राजपत्रात प्रसध्दि झालेल्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी राजपत्रात प्रसिध्द करण्यात आलेली असून अधिसूचनेन्वये अनुसूची 2 मध्ये दर्शविण्यात आल्या प्रमाणे अनुसूचित जाती, अनुसचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि महिला (अनुसूचित जाती, अनुसचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यातील महिलांसह) राज्यातील जिल्हा निहाय सरपंच पदाचे आरक्षण अनुसूची – 1 अनुसूची – 2 अन्वये वाटप करण्यात आले आहे.

त्यानुसार जालना जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी अधिसूचनेद्वारे तालुका निहाय सरपंचाची पदे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी व महिलांसाठी पाच वर्षासाठी (सन 2005 ते सन 2030 दरम्यान गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीकरीता) आरक्षीत करुन संख्या निश्चित केली आहे. जालना तालुका-ग्रामपंचायत संख्या 123, अनुसूचित जाती आरक्षीत अ.जा. 19, महिला 9, अनुसूचित जमाती अ.ज. 2,  महिला 1, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित ना.मा.प्र. 33, महिला 16 आणि खुला प्रवर्गासाठी 69, महिला 34.बदनापूर तालुका-ग्रामपंचायत संख्या 79, अनुसूचित जाती आरक्षीत अ.जा. 11, महिला 6, अनुसूचित जमाती अ.ज. 1,  महिला 0, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित ना.मा.प्र. 21, महिला 11 आणि खुला प्रवर्गासाठी 46, महिला 23.भोकरदन तालुका-ग्रामपंचायत संख्या 124, अनुसूचित जाती आरक्षीत अ.जा. 16, महिला 8, अनुसूचित जमाती अ.ज. 5,  महिला 3 , नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित ना.मा.प्र. 34, महिला 17 आणि खुला प्रवर्गासाठी 69, महिला 34.जाफ्राबाद तालुका-ग्रामपंचायत संख्या 72, अनुसूचित जाती आरक्षीत अ.जा. 13, महिला 6, अनुसूचित जमाती अ.ज. 2,  महिला 1 , नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित ना.मा.प्र. 19, महिला 10 आणि खुला प्रवर्गासाठी 38, महिला 19.परतुर तालुका-ग्रामपंचायत संख्या 81, अनुसूचित जाती आरक्षीत अ.जा. 11, महिला 5, अनुसूचित जमाती अ.ज. 1,  महिला 0 , नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित ना.मा.प्र. 22, महिला 11 आणि खुला प्रवर्गासाठी 47, महिला 24.मंठा तालुका-ग्रामपंचायत संख्या 92, अनुसूचित जाती आरक्षीत अ.जा. 15, महिला 8, अनुसूचित जमाती अ.ज. 2,  महिला 1 , नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित ना.मा.प्र. 25, महिला 12 आणि खुला प्रवर्गासाठी 50, महिला 25.अंबड तालुका-ग्रामपंचायत संख्या 111, अनुसूचित जाती आरक्षीत अ.जा. 14, महिला 7, अनुसूचित जमाती अ.ज. 3,  महिला 2 , नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित ना.मा.प्र. 30, महिला 15 आणि खुला प्रवर्गासाठी 64, महिला 32.घनसावंगी तालुका-ग्रामपंचायत संख्या 96, अनुसूचित जाती आरक्षीत अ.जा. 13, महिला 7, अनुसूचित जमाती अ.ज. 2,  महिला 1 , नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित ना.मा.प्र. 26, महिला 13 आणि खुला प्रवर्गासाठी 55, महिला 28.अशा एकूण जालना जिल्ह्यातील 778 ग्रामपंचायती मध्ये अनुसूचित जाती आरक्षीत अ.जा. 112, महिला 56, अनुसूचित जमाती अ.ज. 18,  महिला 9, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित ना.मा.प्र. 210, महिला 105 आणि खुला प्रवर्गासाठी 438, महिला 219 असणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments