नोंदणीकृत माथाडी बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य वाटप करण्याची सय्यद अशफाक अली यांची मागणी
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) नोंदणीकृत माथाडी बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व
गृहोपयोगी साहित्य संच वाटप करण्याची मागणी सय्यद अशफाक अली यांनी कामगार सहाय्यक उपआयुक्त विभागीय कार्यालय मालजीपुरा रेल्वे स्टेशन यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. नोंदणीकृत माथाडी बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर माथाडी बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्यामार्फत सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य संच वाटप केले जातात. परंतु आपल्या कार्यालयामार्फत सदरील साहित्याचे वाटप मागील सहा महिन्यापासुन बंद आहे. तसेच अनेक माथाडी कामगारांचे नुतनीकरण देखील संपले आहे. आपल्या कार्यालयाच्या उदासिन धोरणामुळे अनेक माथाडी कामगार या योजनेपासून वंचित आहेत.
तरी लवकरात लवकर नोंदणीकृत मायाडी बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य संच वाटप करण्यात यावे. नसता आपल्या कार्यालयासमारे माथाडी कामगार प्रदेश प्रमुख मा. छगन पाटील व माथाडी कामगार प्रदेश उपाध्यक्ष हमद चाऊस तसेच माथाडी कामगार प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माथाडी कामगार प्रदेश सरचिटणीस सादीक इनामदार यांच्या निदर्शनाखाली लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठवाडा सरचिटणीस माथाडी कामगार विभाग, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सय्यद अशफाक अली व शेख अर्सलान यांनी दिला आहे.