Sunday, October 26, 2025
Homeनाशिकअहमदनगरमुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थींचा प्रशिक्षण कार्यकाळ 6 ऐवजी आता...

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थींचा प्रशिक्षण कार्यकाळ 6 ऐवजी आता 11 माहिने

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थींचा प्रशिक्षण कार्यकाळ 6 ऐवजी आता 11 माहिने

छत्रपती संभाजीनगर :- कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाकडून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थी यांना सहा महिने कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येत होते. मात्र आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणार्थींचा प्रशिक्षण कार्यकाळ 6 माहिने ऐवजी 11 माहिने करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी यांचे विद्यावेतन डीबीटीव्दारे ऑनलाईन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.

 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थीचा प्रशिक्षण कार्यकाळ 6 महिने ऐवजी 11 महिने करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी दि. 10 मार्च 2025 किंवा त्यापूर्वी आपले सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले असेल अशा प्रशिक्षणार्थी यांना उर्वरित पाच महिने कार्य प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या वाढीव 5 महिन्याच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवार तसेच सद्यस्थितीत प्रशिक्षण घेत असलेले उमेदवार व योजनेचा नव्याने लाभ घेण्यास इच्छुक उमेदवारांची आधार पडताळणी व आवश्यक कागदपत्रे (उदा. आधार, शैक्षणिक पात्रता, वय, अधिवास प्रमाणपत्र) तपासणी करणे आवश्यक आहे.

योजनेच्या https://www.cmykpy.mahaswayam.gov.in  या वेबपोर्टलवरील प्रतिज्ञापत्राचा नमुना प्रशिक्षणार्थी व आस्थापना यांनी संबंधित सहायक आयुक्त यांच्याकडे सादर करणे गरजेचे आहे.

आधार व कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासाठी रुजू करुन घेण्यात येणार नाही. तसेच, प्रत्येक  प्रशिक्षणार्थी यांची नोंदणी आधार पडताळणी अनिवार्य आहे. ज्या बँक अकाऊंटला आधार लिंक आहे. तोच बँक खाते क्रमांक योजनेच्या विद्यावेतन  डीबीटी साठी नमुद करणे आवश्यक आहे.

प्रशिक्षणार्थी यांनी आधार पडताळणी तसेच आस्थापना यांनी कागदपत्रे तपासणीसाठी आपल्या जिल्ह्याचे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याशी 30 एप्रिल 2025 पर्यंत संपर्क साधून आवश्यक ती तपासणी करुन घ्यावी. याबाबत काही अडचण असल्यास आपल्या जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाच्या उपआयुक्त श्रीमती विद्या शितोळे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments