Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादउस्मानाबादविभागीय लोकशाही दिनाचे 15 एप्रिल रोजी आयोजन

विभागीय लोकशाही दिनाचे 15 एप्रिल रोजी आयोजन

विभागीय लोकशाही दिनाचे 15 एप्रिल रोजी आयोजन

छत्रपती संभाजीनगर/विभागीय स्तरावरील लोकशाही दिनाचे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आयोजन करण्यात येते. परंतु दुसऱ्या सोमवारी, 14 एप्रिल, 2025 रोजी शासकीय सुटी असल्याने विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन मंगळवार, १5 मार्च, २०२५ रोजी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. तसेच नियमित विभागीय लोकशाही दिन संपल्यानंतर विभागीय माहिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

तक्रार करण्यासाठीचे अर्ज विहित मुदतीत नमुना प्रप्रत्र-1 (क) मध्ये दोन प्रतीत आवश्यक त्या कागदपत्रासह विभागीय आयुक्त कार्यालयाचे आवक शाखा प्रमुख (नायब तहसीलदार) यांच्याकडे स्विकारण्यात येणार आहेत.

विहित नमुना अर्ज प्रप्रत्र-1 (क) आवक शाखेत उपलब्ध करून देण्यात आला आहे.  विभागीय महिला लोकशाही दिनासाठी पिडीत महिलांनी विहीत नमुन्यातील मुदत पुर्व अर्ज विभागीय उप आयुक्त, महिला व बाल विकास, तथा सदस्य सचिव यांच्याकडे सादर करता येणार आहेत.

अर्जाच्या दोन प्रती विभागीय लोकशाही दिनाच्या दिवशी विभागीय आयुक्त यांच्याकडे समक्ष पुन्हा सादर कराव्यात. तसेच ज्यांनी यापुर्वीच्या विभागीय स्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेले असतील परंतू त्यांचे प्रकरणात अद्याप कार्यवाही झाली नाही, अशा प्रकरणात त्यांना पुन्हा अर्ज देता येणार नाही.

जिल्हास्तरावरील लोकशाही दिन कार्यक्रमात ज्या प्रश्नांची सोडवणूक होवू शकली नाही किंवा या प्रश्नाबाबत जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये तक्रारदाराचे समाधान झाले नाही, असे सर्व प्रश्न विभागीय स्तरावरील लोकशाही दिनामध्ये घेण्यात येणार आहेत, असे विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments