घृष्णेश्वर महाविद्यालयात २००५ व २००७ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
२० वर्षांनंतर भरला पुन्हा एकदा ‘तोच’ वर्ग!
खुलताबाद / प्रतिनिधी/ खुलताबाद येथील घृष्णेश्वर महाविद्यालय बुधवारी २० वर्षांनंतर वर्ग दहावी २००५ बॅच आणि बारावी २००७ बॅच (कला व विज्ञान शाखा) या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. बालपणाचे मित्रमैत्रिणी, जुन्या आठवणींनी भारलेला परिसर, आणि शिक्षकांचा आशीर्वाद – अशा विशेष वातावरणात कार्यक्रम रंगला या स्नेहमेळा व्याला शाळेचे मुख्याध्यापक संजय वरकड सर,क्रिडा शिक्षक राजेंद्र गंगावणे, माया गंगावणे मॅडम तसेच इतर शिक्षकवृंद, कर्मचारी वर्ग आणि शेकडो माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या सध्याच्या जीवन प्रवासाची माहिती दिली.कोणी देशाची सेवा करण्यासाठी आर्मी मधी संरक्षण क्षेत्रात, कोणी पोलीस खात्यात,तर कोणी शिक्षण,शेती, वैद्यकीय, उद्योग, खाजगी क्षेत्र,फोटो ग्राफी अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असल्याचा अभिमान व्यक्त केला. आपल्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळवलेला पाहून शिक्षक भारावून गेले.
मुख्याध्यापक वरकड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले की, “विद्यार्थ्यांची ही प्रगतीच आमच्या साठी खरी गुरुदक्षिणा आहे.” यावेळी माजी विद्यार्थी व माजी नगरसेवक परसराम बारगळ यांनी शाळेसाठी एका वर्गाची वॉलपुट्टी व रंगकामाची जबाबदारी स्वतःवर घेत असल्याची घोषणा करत उपस्थितांची मने जिंकली. सोशल मिडियाचा प्रभावी वापर करून तब्बल २० वर्षांनंतर सर्व वर्गमित्रांना एकत्र आणण्याचे उत्कृष्ट कार्य सिद्धार्थ घुसळे या विद्यार्थिनी यांनी केले असून, सर्व मित्रांनी त्यांच्या या प्रयत्नाचे कौतुक करून मनःपूर्वक आभार मानले तसेच या स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी रंजना सोमवंशी,नितीन भाकरे,सतीश पवार, परसराम बारगळ, दिनेश कायस्थ,रेखा गोरे जया काळे यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन भाकरे.व रेखा वाकळे, यांनी केले. “मैत्रीचं नातं हे काळाच्या पलीकडे जातं,” हे या कार्यक्रमातून पुन्हा एकदा सिद्ध झालं. उपस्थित सर्वांनी दरवर्षी असा स्नेहमेळावा आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता झाली.
