आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आष्टी येथे “ग्रामदरबार” कार्यक्रम
आष्टी/ प्रतिनिधी / ग्रामीण भागाचा विकास करणे म्हणजे खऱ्या अर्थाने देशाच्या विकासाला हातभार लावणे आहे असे मी समजतो. महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा विकास म्हणजे आर्थिक, सामाजिक आणि भौतिक सुविधा यांसोबतच, लोकांच्या जीवनमानामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. शेती आणि उद्योगांना प्रोत्साहन देणे, आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत विकास करणे, शेती आणि पशुपालनात सुधारणा, नवीन रोजगार निर्मिती, आणि उद्योगांना प्रोत्साहन देणे यासह शिक्षण, आरोग्य, आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा यांसारख्या सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे रस्ते, वीज, आणि पाणीपुरवठा यांसारख्या सुविधा विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होणे शक्य होणार नाही ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासातूनच भारत प्रगत राष्ट्र बनू शकते असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी आज केले.
परतुर तालुक्यातील आष्टी येथे ग्राम दरबार कार्यक्रम संपन्न झाला असून या ग्राम दरबार अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी झिरो पेंडन्सी वर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असून ग्राम दरबार झाल्यानंतर सर्व समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे. प्रत्येक तालुक्यातील एका एका गावात “एक दिवस गावक-यांसोबत (ग्राम दरबार उपक्रम)” हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आला. यावेळी ग्राम दरबारा निमित्ताने आयुष्मान भारत कार्ड व महात्मा फुले जन आरोग्य योजना आयुष्मान भारत गोल्डन कार्ड बनवून देण्यासाठी ग्राम दरबार निमित्त कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते, याबरोबरच किसान क्रेडिट कार्ड, नवीन आधार कार्ड व दुरुस्ती कॅम्प, क्षयरोग तपासणी शिबिर व रक्त तपासणी शिबिरासह विविध कॅम्पचे देखील आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा स्तरावरील विविध खाते प्रमुखांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तालुक्याचे वाटप करुन त्यांना रोटेशन पध्दतीने एका तालुक्याच्या एका गावामध्ये उपस्थित राहण्याबाबत निर्देशित करण्यात आले. या उपक्रमाच्या अंतर्गत जिल्हा स्तरीय अधिकारी यांचे समवेत पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येणा-या एका गावास प्रत्येक आठवड्यातील बुधवारी पंचायत समितीचे विविध विभागाचे अधिकारी व ग्राम पातळीचे अधिकारी हे संयुक्तपणे गावात जाऊन ग्रामस्थांसमवेत या उपक्रमाची अंमलबजावणी करतील अशी सूचना देखील यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केली.
ग्रामपंचायत, पंचायत समिती, आणि जिल्हा परिषद यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण विकास करण्यापेक्षा. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबवून ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनात सुधारणा करणे, शेती आणि उद्योगांना प्रोत्साहन दिल्याने लोकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शिक्षण, आरोग्य, आणि चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्याने लोकांचे जीवनमान सुधारते.
नवीन उद्योग आणि योजनांमुळे रोजगाराच्या संधी वाढतात. स्थानिक पातळीवर विकास केल्याने लोक आत्मनिर्भर होतात. त्यामुळे ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वत्र प्रयत्न करण्यासाठी मी सदैव तत्पर राहण्याचा प्रयत्न करतो असेही यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले.
भारतातील ६५% लोकसंख्या आजही ग्रामीण भागात राहत आहे. ग्रामीण भागातील पुनरुत्थानासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबविले गेले. महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील खेडी ही स्वयंपूर्ण, स्वयंशासीत असावीत अशी सर्व ग्रामस्थांची अपेक्षा असते. शासनाच्या विविध योजना, उपक्रम व सेवा ग्रामस्थांच्या दारी पोहचविणे हेच सुप्रशासनाचे लक्षण आहे. याच मुद्दावर आधारीत ग्रामीण भागात काम करणा-या सर्व विभागांच्या अधिका-यांमार्फत प्रत्येक गावामध्ये विविध सेवा ठराविक कालावधीत पोहचविण्याच्या अनुषंगाने “ग्राम दरबार – दिवस गावक-यांसोबत” हा नाविन्यापुर्ण उपक्रम परतूर विधानसभा मतदारसंघात अत्यंत उत्साहाने व कल्पकतेने राबवला जात आहे याचा मला अभिमान आहे. असे प्रतिपादन माजीमंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी आज केले.
ग्रामपंचायत च्या अख्त्यारीत असणा-या विविध अभिलेख्यांवर आधारीत सेवा हमी कायद्यांतर्गत विविध उता-यांचे निर्गमन करणे, ग्रामपंचायतीच्या वरिष्ठ अधिका-यांकडून ग्रामपंचायतींचे अभिलेख्यांचे सखोल तपासणी करणे, ग्रामपंचायतच्या विविध कर वसुली त्यादिवशी १००% पूर्ण करणे, ग्रामसभेचे आयोजन करणे, वैयक्तीक विविध लाभांच्या योजनांचे अर्ज परिपुर्ण तयार करणे, ग्रामपंचायच्या विविध प्रलंबित ८-अ अंतर्गत नोंदी मंजुर करुन घेणे व नागरीकांना ८-अ चे उतारे देणे, ग्रामपंचायतकडे प्रलंबीत तक्रारींचा निपटारा करणे, गावांतर्गत रस्ते, नाली बांधकाम, दोन गावांना जोडणारे रस्ते व इतर बांधकामांन देणे या कामांसह कृषी विभागांतर्गत शेतक-यांसाठी पिक नियोजन, किड नियंत्रण, खत नियोजन, योग्य बियाणांचा वापर, रसायणमुक्त शेती, झिरो बजेट फार्मिंग अशा विविध विषयांवर मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर आयोजीत करणे, शेतक-यांना कमी पाण्याचा वापर बाबतचे विविध तंत्रज्ञानाची माहिती देणे, शेतक-यांच्या शेतातील माती परिक्षणासाठी माती नमुने गोळा करणे, बायोगॅस, सौर चुली व विविध पारंपारिक उर्जा तंत्रज्ञानाची माहिती देणे अशी कामे करण्यात यावीत असेही लोणीकर यावेळी म्हणाले.
ग्राम शिक्षण समिती व तालुक्यांचे शिक्षण विभागाचे अधिकारी यांचे उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे गुणवत्ता तपासणीसाठी उपक्रम राबविणे, शाळेची संपूर्ण सफाई, स्वच्छता, पाण्याच्या टाकीची सफाई, किचन सफाई, स्वच्छतागृहांची सफाई, परिसर स्वच्छता इ. उपक्रम राबविणे, शिक्षण विभागातील अधिका-यांमार्फत शाळेची सखोल तपासणी ग्राम शिक्षण समितीच्या उपस्थितीमध्ये करणे, शाळेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करणे, गावामध्ये प्रभातफेरीचे आयोजन करणे, नवीन शाळाखोली बांधकाम पाहणी करणे यासह महिला व बाल कल्याण व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत गावातील महिलांची स्वयंसहायता गटांची स्थापना करणे, बंद पडलेल्या गटांना मार्गदर्शन करुन पुर्नजिवित करणे, स्वयंसहायता गटांना अभिलेख लिहिणे, बैठकीचे कामकाज चालविणे, बँकेचे कामकाज करणे याबाबत प्रशिक्षण आयोजीत करणे, स्वयंसहायता गटांना कौशल्य वृध्दीसाठी प्रशिक्षण देणे, विविध व्यवसाय उभारणी कामी आवश्यक ती सर्व विषयांचे प्रशिक्षण देणे हे सर्व उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देखील आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली.
यावेळी महिलांना संवाद कौशल्य व अन्य Soft Skill चे प्रशिक्षण देणे, गावातील किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक समुपदेशनचे व्याख्यान आयोजीत करणे, महिलांना सॅनिटरी नॅपकीन वापराबाबत माहिती देणे, अंगणवाडी इमारत बांधकाम पाहणी करणे, अंगणवाडी केंद्राना भेटी देणे. कुपोषीत बालके, गरोदर महिला व स्तनदा माता यांना आहार व आरोग्य सेवा देणेबाबत पाठपुरावा करणे, वयोवृध्द लोकांसाठी स्वतंत्र तपासणी करणे, गरोदर मातांची तपासणी करणे, विविध रक्त तपासण्या करणे, माता व बालकांचे लसीकरण करणे, रक्तदान, नेत्रदान, अवयवदान इ. शिबिरांचे आयोजन करणे, नेत्र तपासणी, मौखिक आरोग्य तपासणीचे आयोजन करणे, ग्रामस्थांना आहार विषयक मार्गदर्शन करणे, ग्रामस्थांना विविध आजारांमध्ये घ्यावयाच्या काळजीविषयी मार्गदर्शन करणे, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र बांधकामांना भेटी देणे यासारखी कामे पूर्ण करावीत अशी सूचना देखील यावेळी आमदार लोणीकर यांनी दिली.
गावातील पशुधन वाढावे यासाठी पशुधनाची आरोग्य शिबिरे आयोजीत करणे, विविध प्रकारचे लसीकरण करणे, देशी वाण संवर्धन व वृध्दीसाठी प्रशिक्षण देणे, शेतक-यांना गोठा नियोजन, मलमुत्र नियोजन, जनावरांची निगा, आहार, दुग्ध वाढीसाठी आवश्यक बाबी यांचे प्रशिक्षण देणे, शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन अर्ज तयार करणे, पशुसंवर्धन केंद्र व उपकेंद्र बांधकामांना भेटी देणे यासह समाज कल्याण विभाग अंतर्गत गावातील मागासवर्गीय वस्तीमध्येस्वच्छता अभियान राबविणे, विविध शासकीय योजनांबाबत तसेच कायदेविषयक बाबी बाबत वस्तीतील नागरीकांना मार्गदर्शन करणे, विविध योजनांचे लाभार्थी निवड करुन त्यांचे अर्ज तयार करणे, अनुसुचित जाती जमाती वस्ती अंतर्गत विकास कामांना भेटी देणे, गावातील विविध पाण्याच्या उदभवाच्या कार्यक्षेतामध्ये ग्रामस्थांच्या मदतीने स्वच्छता अभियान राबविणे, गावातील पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन मधील लिकेज काढणे, पिण्याच्या पाण्याच्या विविध उदभवातील पाण्याचे नमुने काढणे, पाणी शुध्दीकरणाबाबत कर्मचा-यांचे प्रशिक्षण आयोजीत करणे, गावातील नागरीकांना पाणी बचतीबाबत मार्गदर्शन करणे, गावातील नागरीकांच्या घरामध्ये असणा-या नळांना तोट्या बसविणे, पाण्याची टाकी सफाई करणे, जल जीवन मिशन अंतर्गत असलेल्या योजनांना भेट देऊन पाहणी करण्यात यावी अशी सूचना देखील यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी केली.
गावांतर्गत संपुर्ण स्वच्छतेचा कार्यक्रम राबविणे, सर्व नागरीक शौचालयाचा वापर करत असल्याची खात्री करणे, जे नागरीक शौचालयाचा वापर करत नसतील त्यांना वापर करण्यास भाग पाडणे, गावातील नाल्या सफाई करणे, परस बागाची निर्मिती करणे, गावातील खुरटी झुडपे, गाजर गवत निर्मुलन करणे, गावातील नागरीकांना ओल्या व सुक्या कच-यासाठी कचरा कुंडीचे वाटप करणे, गावातील घनकच-याच्या विलगीकरणाची व कचरा प्रक्रियेची आखणी करुन त्याची सुरुवात करणे, गावामध्ये प्लास्टीक निर्मुलन मोहीम राबविणे, गावातील सांडपाण्यासाठी शौष खड्डे आखणी करुन पुर्ण करुन घेणे व नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी नियोजन करणे, गावातील सर्व शासकीय इमारतींना रंगरंगोटी, डागडुजी व स्वच्छता करणे, गावातील उकिरड्यांच्या ठिकाणी नरेगा अंतर्गत नाडेफ उभारणीसाठी नियोजन करणे यासारखी कामे करावीत असे लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे सिंचन व जलसंधारण संदर्भात बोलताना श्री लोणीकर म्हणाले की, गावातील शिवार फेरी ग्रामस्थांच्या समवेत करणे, गावातील विविध जलसंधारणच्या उपचारांना भेटी देऊन त्याची देखभालीसाठी ग्रामस्थांच्या समित्या तयार करणे, विविध खराब झालेल्या स्ट्रक्चरची डागडूजी करणे, लोकवर्गणीतून नाला खोलीकरण व सरळीकरण तसेच बांध बंदिस्ती या सारखी कामे करणे, मनरेगा अंतर्गत जलसंधारणाच्या विविध उपचाराची जागा निवडून त्याचा आराखडा मंजुरीसाठी तयार करणे, मनरेगा अंतर्गत विविध प्रस्ताव तयार करणे यासारखी कामे तात्काळ पूर्ण करावीत. अशा सूचना देखील यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी दिल्या. यावेळी प्रकल्प संचालक सुनिल पठारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) उदयसिंग राजपुत, भाजपा परतुर तालुका अध्यक्ष शत्रुघ्न कणसे, परतुर गटविकास अधिकारी राजेश तांगडे पोलीस निरीक्षक सुरासे, गजानन लोणीकर, सरपंच सौ.शोभा मधुकर मोरे उपसरपंच नसरुल्ला काकड, रामदास सोळंके, बाबाराव थोरात उमेश सोळंके तुकाराम सोळंके विष्णु शहाणे, रमेश थोरात मारुती थोरात अनंत आगलावे अल्ताफ कुरेशी सोमनाथ सातपुते आसिफ कच्छी, रफिक राज सईद शेख ग्रामविस्तार अधिकारी डी.बी. काळे मोहम्मद भाई जमीनदार खैसर सर मुजिक भाई राज खंडेराव काका पाटील रामजी मोरे भगवानराव कांबळे परमेश्वर भालशंकर जिल्हा परिषद सदस्य बंकट नाना सोळंके बाबू गोसावी श्री सर गांजाळे ग्रामपंचायत सदस्य बबलू सातपुते बाबा सोळंके तालुकाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण सर्व ग्रामसेवक संघटना विस्तार अधिकारी एस एम अंभोरे सर्व अंगणवाडी कार्यकर्त्या आरोग्य विभागाच्या सर्व आशा कार्यकर्त्या आष्टीतील सर्व बचत गटाच्या महिला यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.