पैठणकरांची पाण्यासाठी वणवण दोन दिवसांपासुन ,नागरिक हैराण पाण्यासाठी महिला परेशान..!
पैठण/ प्रतिनिधी/पैठणचा ‘नाथसागर’ पाणपसाऱ्याने ‘तुडुंब भरलेलं असतांना पैठण शहर मात्र तहानलंय आहे. पाईप लाईन फुटल्यामुळे शहरभर पाण्याची बोंब वाढली आहे. पैठण न.प. प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. दरम्यान, धरण उशाला अन् कोरड घशाला? अशी विचित्र परिस्थिती शहरांत बघायला मिळते आहे. पैठणकर पाण्याच्या ‘शोधात’ आहेत, याला काय म्हणायचे..? पैठणचे भवानीनगर, छत्रपती कॉलनी, परदेशीपुरा, नाथगल्ली, दुर्गावाडी, नेहरू चौक, नारळा, कावसान,ईदिरानगर, पोलीस कॉलनी, करडीमोहल्ला भागातील अनेक भागात नळांना पाणी येत नसल्याने लोके तहानलेली आहेत. पाईप लाईन फुटली असली तरी पैठण शहर पाणी टंचाई प्रश्नाच्या ‘चक्रव्यूह’ मधून बाहेर पडलेला नाही, हे येथे उल्लेखनीय असल्याचे दिसतआहेत! विषेश म्हणजे ‘तुडुंब भरलेलं पैठणचं नाथसागर धरन हे हाकेच्याअंतरावर असून देखील पैठणच्या महिला भीगिनींना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. या सारखे आश्चर्य जनक बाब कोणती म्हणायचे? ‘नाथसागर उशाला असून देखील पैठण शहरवासीयांच्या घशाला ‘कोरड’ पडलेली आहे, ‘हे विशेष! या सर्व प्रकारावर पैठण न. प. पाणी पुरवठा विभाग सुस्तावलं असून नुसतीच ‘बघ्याची’ भूमिका घेत आहे. तर, याबाबत कोणीही कणखर भूमिका उचलत नाही. या संदर्भात मार्गदर्शन करणारा कोणताही मोठा नेता या बाबत आपले सहमत दर्शवत नसल्याचे निदर्शनास येत आहेत याबद्दल काही एक माजी नगरसेवक तथा न.प.कर्मच्यारी अधिकारी यांना समक्ष भेट घेन आवघडच पण फोनवरती बोलने ही वावगे ठरते सध्यास्तितीत नागरिक हे कित्येक दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी हैराण व हतबल झालेले आहेत पैठण न.प. ला दाडग्या नेतृत्वाची गरज असल्याचे दिसून येत आहेत भावी तथा माजी नगरसेवक ही बघ्याची भुमीका घेत असल्याचे दिसून येत आहेत.
