Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादएमजीएममध्ये मोफत ऍप्टिट्यूड टेस्ट आणि करिअर मार्गदर्शन

एमजीएममध्ये मोफत ऍप्टिट्यूड टेस्ट आणि करिअर मार्गदर्शन

एमजीएममध्ये मोफत ऍप्टिट्यूड टेस्ट आणि करिअर मार्गदर्शन

छत्रपती संभाजीनगर, दि.८ : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्यावतीने १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोफत ऍप्टिट्यूड टेस्ट व करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दररोज तज्ज्ञ व्यक्ती स्वतः विद्यार्थ्यांची ऍप्टिट्यूड टेस्ट घेतात व त्याचे निकाल तत्काळ घोषित केले जातात. विद्यापीठात दररोज सकाळी ९ ते ५ दरम्यान विद्यार्थी भेट देऊन या उपक्रमाचा लाभ घेऊ शकतात.

या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडी ओळखून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी योग्य विषय निवडण्यात मदत करणे हा आहे. या चाचणीच्या आधारे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वभाव व कलानुसार करिअरची दिशा ठरवण्यास मदत केली जाते.

या उपक्रमाचा शैक्षणिक वर्ष २०२५ -२६ मध्ये १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून पालक व विद्यार्थ्यांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. ज्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ घ्यायचा आहे अशा इच्छुक विद्यार्थ्यांनी एमजीएम विद्यापीठाच्या www.mgmu.ac.in या संकेतस्थळास भेट देऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी थेट मार्गदर्शनासाठी विद्यापीठास भेट देऊ शकतात. या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९०६७६१२००० या भ्रमणध्वनीवर संपर्क साधता येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीमध्ये या उपक्रमाचे महत्वपूर्ण स्थान असून मोठ्या संख्येने १० आणि १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments