आरतीचे ताट सजावट स्पर्धेने वेधले लक्ष
भ. महावीर जन्म कल्याणक महोत्सव महिला समिती अंतर्गत अरिहंतनगर महिला मंडळ, बालाजीनगर महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आरतीचे ताट सजविणे स्पर्धा झाली.
आदिनाथ जैन मंदिर येथील स्पर्धेत रांगोळी,पंचरंगी रिबन ध्वज, आरसा, कुंदन, विविध पान -फुले, बांगड्या, तांदूळ, विविध डाळी, साबुदाणा, ट्युशी लेसची फुले, कणकेचे रंगीत दिवे, याचा कल्पकतेने वापर करत मानस्तंभ, परस्परोग्रह जीवाणम,पूर्णार्ध्याने आकर्षक आरतीचे तबक सजवले होते.
स्पर्धा संयोजक अरिहंतनगर अध्यक्षा अनिता पहाडे, प्रतिभा पाटणी, वंदना अजमेरा, नीता गडेकर, अर्चना अजमेरा, कुसुम अजमेरा,नीलू गंगवाल, मधु कासलीवाल, वर्षा कासलीवाल, मीना अजमेरा तसेच बालाजीनगर च्या मंगलकासलीवाल ,कविता काला, चारुलता कासलीवाल, रक्कर कासलीवाल यांनी परिश्रम घेतले.
परीक्षक म्हणून पूजा अजमेरा दिशा बडजाते यांनी काम पाहिले. मंगलाचरण तसेच सूत्रसंचालन रूपाली रावका यांनी केले.
प्रारंभी स्वप्निल पारख, भारती बागरेचा, संगीता संचेती, सारिका साहूजी, सविता लोढा,मनीषा भन्साळी, ललिता साखला, करुणा साहूजी,निलेश जैन, प्रतीक साहूजी, बाहुबली वायकोस प्रमोद पाटणी, तनुजा गांधी, आदींच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन झाले. यावेळी कविता अजमेरा,नीता गादीया,मंजू पाटणी, मीना पापडीवाल, मेघा सुगंधी, आशा कासलीवाल आदीसह महिला उपस्थित होत्या. अशी माहिती स्पर्धा प्रसिद्धी प्रमुख प्रशांत शहा नरेंद्र अजमेरा पियुश कासलीवाल यांनी दिली.