तिहेरी हत्याकांडाचा यशस्वी तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान
पैठण पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक तथा तपासी अधिकारी किशोर पवार सर व जमादार नरेंद्र अंधारे यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरव
पैठण – संपूर्ण मराठवाड्यात गाजलेल्या पैठण मधिल कावसान येथील तिहेरी हत्याकांडाचा यशस्वी तपास करून आरोपींना न्यायालयापर्यंत पोहोचवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचा आज सन्मान करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास अतिशय कुशलतेने व तत्परतेने हाताळल्याबद्दल पैठण पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व तपासी अधिकारी किशोर पवार तसेच जमादार नरेंद्र अंधारे यांना मा. पोलीस अधीक्षक ग्रामीण डॉ. विनय कुमार राठोड सर व अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह मॅडम यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व 3000 रुपयांची रोख पारितोषिक रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
या सन्मानामुळे पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळणार असून, अशा कारगिरीमुळे समाजात कायद्याचा धाक निर्माण होण्यास निश्चित मदत होणार आहे.
या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्व स्तरातून किशोर पवार व जमादार नरेंद्र अंधारे यांना अभिनंदन होत आहे आपल्या कार्यकुशलतेस सलाम!
