Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादश्री गजानन महाराज भव्य दिव्य मुर्ती ची प्राणप्रतिष्ठा आणि कळसारोहन सोहळ्याची सांगता...

श्री गजानन महाराज भव्य दिव्य मुर्ती ची प्राणप्रतिष्ठा आणि कळसारोहन सोहळ्याची सांगता…

श्री गजानन महाराज भव्य दिव्य मुर्ती ची प्राणप्रतिष्ठा आणि कळसारोहन सोहळ्याची सांगता…
आत्ताच एक्सप्रेस 
सोयगाव /प्रतिनिधी / विजय पगारे / सोयगाव तालुक्यातील पिंपळा येथे (ता.३) गुरुवारी सकाळीसत्रात सात वाजता हा.भ.प.श्री.वासुदेव महाराज शास्त्री, रूख्मीणी पांडुरंग संस्थान,वागजाळफाटा ता मोताळा जि.बुलढाणा हस्ते शांतिपिठ, संकल्प, स्थापित, देवपुजन, महाराजांचा, राज्याभिषेक, महाआरती, तर ९:१६ वा. प्राणप्रतिष्ठा, तदनंतर १०:१५ कळसस्थापना झाले.आणि उपस्थित पंचक्रोशीतील भाविक भक्त परिवारास स्वादिष्ट महाप्रसाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात सांगता करण्यात आली.
पिपळा ता. सोयगाव गेल्या (ता.३१)सोमवार पासुन श्री संत गजानन महाराज भव्य दिव्य मुर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कळसारोहन सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात आले, पहिल्या दिवशी श्री गजानन महाराज भव्य दिव्य मुर्ती ची जय जय कार करिता गावभर परिक्रमा करण्यात आली, मंगळवारी (ता. १) एप्रिल श्री .रविंद्र बाबुराव वाघ, पिंपळा याचे हस्ते शांतिपिठ, प्रधान संकल्प, गणेश मुर्ती चे पुजन, पुण्याहवाचन, ब्रम्हपुजन, सर्वपिठ स्थापना, जलधिधिवास, धान्याधिवास, नैवेद्य, आरती आणि बुधवारी (ता.२) एप्रिल श्री. मनोज दिपक वाघ शातिपिठ, संकल्प स्थापित, देवता पुजन, महाराजांना अभिषेक सर्व औषधीस्नान, बलीदान पुर्णाहुती,भटानैवद्य, महाआरती आदी भक्तिमय वातावरणात शांततेत महत्त्वपूर्ण कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमाला पुणे, नागपुर, मुंबई, अहमदनगर, जळगाव,  अकोला, खामगाव, बुलढाणा,छ. संभाजीनगरसह परिसरात दहा हजारांहून अधिक भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा मंगलमय वातावरणात लाभ घेतला. ता. ३ गुरुवारी श्री. अमोल रमेश आंधळे पिंपळा यांचेकडून १२ वाजेनंतर पंचक्रोशीत आलेल्या सर्व भाविक भक्तांना स्वादिष्ट महाप्रसाद देण्यात येवून सर्व भक्तांना तृप्त केले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments