वक़्फ अमेंडमेंट बील विरोधात लोकसेनाचे होणारे आंदोलन स्थगित अजित पवार यांच्या दौ-यामुळे पोलिसांनी नाकारली परवानगी
लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार
बीड /प्रतिनिधि/ केंद्रातील भाजपा मोदी सरकार मुस्लिम विरोधी वक़्फ कायदा 2024 संसदेत आणणार आहे या कायदयाचा विरोध दर्शवन्यासाठी लोक सेना संघटनेच्या वतीने लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांच्या नेतृत्वाखाली दि.02/04/2025 रोजी आंदोलन होणार होते व पुढे जिल्हाधिकारी कार्यालय बीडवर बेमुदत उपोषणाला बसणार होते हा आंदोलन उपोषण शांततेत व लोकशाही मार्गाने होणार होता रहदारीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची लोक सेना संघटनेच्या वतीने हमी देण्यात आली होती तरी ही पोलिस प्रशासनाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्हा दौ-यावर येत असल्याने लोक सेना संघटनेला परवानगी दिली नाही पोलिस प्रशासनने एका मंत्रीच्या दौ-यामुळे आम्हाला आमच्या संवैधानिक हक़्कापासुन वंचित ठेवल्याने तमाम मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावले गेल्यामुळे लोक सेना या घटनेचा जाहिर निषेध करत असुन आजचा होणारा आंदोलन स्थगित केला आहे असे लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी जाहिर करत आहे.