पूर्णवादी बँकेस 8 कोटी 76 लाखाचा नफा
छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी / पूर्णवादी नागरिक सहकारी बँक म., बीड ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य बँक असून बँकेने प्रति वर्षा प्रमाणे आपल्या आर्थिक कामगारीचा आलेख उंचावत ठेवला आहे.2024-25 या आर्थिक वर्षात बँकेला बँकेचे जेष्ठ संचालक मा. डॉक्टर अरुणदादा निरंतर यांच्या मार्गदर्शना खाली व नूतन अध्यक्ष डॉ. सुभाष जोशी यांचे नेतृत्वात रू. 8 कोटी 76 लक्ष एवढा भरघोस नफा झालेला असून मागील वर्षाच्या तुलनेत 1 कोटी 20 लाख वाढ झाली आहे. दि. 31/03/2025 रोजी आर्थिक वर्षाअखेर बँकेच्या एकुण ठेवी रू. 897.18 कोटी एवढ्या असून कर्जे रू. 537.44 कोटीची आहेत.बँकेचा एकत्रित व्यवसाय 1434.62 कोटींचा झाला असून एकत्रित व्यवसायात 110 कोटीची वाढ झाली आहे. बँकेचे भागभांडवल रू. 28.48 कोटी असून बँकेची नेटवर्थ रू. 63.67 कोटी एवढी आहे तर बँकेच्या नेट एन.पी. ए.चे प्रमाण केवळ 0.60 % इतके आहे जे की नगण्य असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजेश कुलकर्णी यांनी दिली तसेच त्यांनी सांगितले कि, बँकेच्या या यशात बँकेचे सर्व सन्मानीय सभासद, ग्राहक, संचालक व सर्व कर्मचारी वृंदाचे फार मोठे योगदान आहे. बँकेचे अध्यक्ष डॉ.सुभाष जोशी यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली तसेच बँकेचे जेष्ठ मार्गदर्शक डॉ अरुणदादा निरंतर यांचे मार्गदर्शनाने, उपाध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत पारनेरकर व बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चे अध्यक्ष सी. ए. एस.पी. लड्डा व सर्व संचालक यांचे साथीने बँकेने सर्व आघाडींवर प्रगती साधून ग्राहकांचा बँकेवरील विश्वास अभेद्य ठेवून केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे.