गंगापूर शहरातील घटना एका दुकानाला लागली आग तीन दुकाना जळून खाक लाखो रुपयांचा नुकसान

0
48
गंगापूर शहरातील घटना एका दुकानाला लागली आग तीन दुकाना जळून खाक लाखो रुपयांचा नुकसान
गंगापूर /प्रतिनिधी /सुभान शहा /गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात (१) एप्रिल रोजी संध्याकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास एका दुकानाला आग लागल्याची घटना घडली. वैजापूर रोडवरील कोर्टासमोर असलेल्या अक्रम बागवान यांच्या फळांच्या गोडावुनला ही आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि शेजारील सुमंत टाकसाळ यांच्या माहेश्वरी नॉव्हेल्टीपर्यंत आग पोहोचली. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच, शेजारील नवनाथ हॉटेलमधील काही साहित्य नागरिकांनी काढले व आग विझवण्याच्या प्रयत्नांसाठी शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती. आणि ही आग इतकीच भिषण होती की आटोक्यात येत नव्हती आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत पत्रकार अन्वर बागवान यांनी आपल्या जीवाची परवा न करता आग विझवत असताना त्यांच्या हाताला व बोटाला गंभीर दुखापत झाली आहे. आग इतकी भिषण होती की याआगीत दुकानाचे मोठे नुकसान,  कम्प्युटर, फ्रिज, वह्या पुस्तके, झेरॉक्स मशीन आणि इतर जनरल साहित्य जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन खाजगी पाण्याच्या टँकरच्या सहाय्याने आगविझवण्याचा प्रयत्न केला. माजी नगराध्यक्ष संजय जाधव, व त्यांचे सहकारी, तसेच माजी नगरसेवक भाग्येश गंगवाल, शहरातील नागरिक मोठ्या संख्येने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते मात्र, नगरपरिषद अग्निशमन दलाची गाडी उशिरा पोहोचल्याने आग आटोक्यात आणण्यास विलंब झाला. मात्र अग्निशमन दलाची गाडी आल्यानंतर ही आग आटोक्यात आली.  ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे,