Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादशक्तीशाली भूकंपाने म्यानमार-थायलंड हादरवले;अशाप्रकारे नैसर्गिक महाप्रलय जगात कुठेही येवू शकतात;सावधान!

शक्तीशाली भूकंपाने म्यानमार-थायलंड हादरवले;अशाप्रकारे नैसर्गिक महाप्रलय जगात कुठेही येवू शकतात;सावधान!

प्रति/ माननीय संपादकजी

विषय/शक्तीशाली भूकंपाने म्यानमार-थायलंड हादरवले;अशाप्रकारे नैसर्गिक महाप्रलय जगात कुठेही येवू शकतात;सावधान!
दिनांक २८ मार्च २०२५ ला म्यानमार-थायलंडचा ७.७ तीव्रतेचा भयावह भूकंप तेथील जनतेसाठी अंधक्कारात नेणारा ठरला व  यामध्ये शेकडोच्या संख्येने जिवितहानी झाली असून लाखोंच्या संख्येने गंभीर जखमी झालेत व अनेकजन अजुनही ढीगाऱ्यामध्ये दबलेले आहेत.हे दृश्य पाहून अंगावर शहारे येतात.म्यांमार-थायलंड किंवा अन्य ठिकाणी भयावह भूकंप किंवा महाप्रलय का येतात!याचे जिवंत उदाहरण म्हणजे मानवाने निसर्गावर केलेला अन्याय व अत्याचार होय.आज मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी आकाश-पाताळ -पृथ्वी, चंद्र-सुर्य, पुर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण,ग्रह-तारे या सर्वांवर अतीक्रमन करून स्वतःसाठी सुखसुविधा निर्माण केल्या.परंतु या सुखसुविधा विनाशाकडे नेणाऱ्या आहेत आणि त्याचेच प्रायश्चित्त आज म्यानमार-थायलंड सारख्या जगातील अनेक देशांना भोगावे लागत आहेत व पुढेही मोठ्या प्रमाणात भोगावे लागण्याचे चिन्ह दिसत आहे. आज मानवाने केलेल्या प्रगतीचा दुरूपयोग होत असल्याने भूकंप, सुनामी, महाप्रलय,वनवे लागने,अती उष्णता,अती पाऊस,अती थंडी, ग्लेशियर वितळणे,ज्वालामुखीचा उद्रेक, समुद्राची पातळी वाढने,जमिनीतुन खनीज संपत्ती काढून तीला खोकला करने, भुजलसाठा दिवसेंदिवस कमी होणे या संपूर्ण विनाशकारी उद्भवणाऱ्या घटना मानवाने स्वतःहून ओढवल्या आहे.कारण वाढते शहरीकरण,औद्योगिकीकरण व सुखसुविधा याकरीता मोठ्या प्रमाणात जगात जंगलतोड सुरूच आहे. यामुळे पृथ्वीच्या पोटात ज्या प्रमाणात पाणी साठा किंवा भुजलसाठा पाहिजे होता तो साठा अजीबात नसुन; जो आहे तोही दिवसेंदिवस कमी-कमी होत आहे.यामुळे जगात मोठ्या प्रमाणात वनव्याच्या घटना, भूकंप,ज्वालामुखीचा उद्रेक वाढतांना दिसतात.त्याचप्रमाणे ज्वालामुखीचा उद्रेक यांचेही मुख्य कारण जंगलतोड व बदलत्या हवामानामुळे होत आहे हे भयावह दृश्य आज आहे आणि पुढे चालून उग्र रूप धारण करून महाभयानक होण्याचे संकेत दिसत आहे. जग निर्मात्या संपूर्ण धर्मांच्या देवी-देवतांनी मानवाला जन्माला यासाठी घातले की या पृथ्वीतलावर एकतरी बुध्दीजीवी प्राणी असावा जेणेकरून तो संपूर्ण मानवजातीसह, मुक्या प्राण्यांची, संपूर्ण जीवजंतू, पशुपक्षी, निसर्ग व पृथ्वी यांचे रक्षण करू शकला पाहिजे.परंतु आज मानवाने स्वतःच्या फायद्यासाठी व स्वार्थासाठी संपूर्ण सीमारेषा ओलांडून आज पृथ्वीवरील संपूर्ण प्राणीमात्रांचा जीव धोक्यात टाकला आहे व याचे जिवंत उदाहरण म्हणजे म्यानमार-थायलंडमध्ये ७.७ तीव्रतेचा आलेल्या भूकंपाने संपूर्ण अस्तव्यस्त करून हाहाकार निर्माण केला.आज जगातील अनेक देश आगीशी खेळतांना दिसतात यात अमेरिका, रशिया, युक्रेन, इजरायल, इराण, पोलंड,चीन, उत्तर कोरिया इत्यादीसह अनेक देश एकमेकांवर बंदुका तानुन बसले आहेत व मोठ्या प्रमाणात बॉम्ब वर्षाव करीत आहे यामुळे सर्वत्र आगडोंब उसळल्याचे दिसून येते आणि हे सर्व वर्चस्वाच्या लढाईसाठी आहे.याकरीता एकमेकांना मोठ्या प्रमाणात विनाशकारी युद्ध सामुग्रीची देवाणघेवाण सुध्दा करीत आहेत.यामुळे अनेक देश युध्दाच्या खाईत लोटल्याने तीथे फक्त आगीचे गोळे बरसतांना दिसतात. आज जगातील करोडो एकर भुभागांची राखरांगोळी झालेली आहे व अनेक मोठमोठी जंगले आताही जळत आहे.जगातील संपूर्ण देश आज बारूतच्या ढीगाऱ्यावर बसले आहे. एवढे नुकसान डोळ्यासमोर असुनही रशिया -युक्रेन, इजरायल-इरान,हमास सह अनेक देश एकमेकांना संपविण्याची भाषा करीत आहे व युद्ध सामुग्रीच्या शर्यतीत चढा-ओढ सुरू आहे.म्हणजेच आज जग किती विनाशाकडे जात आहे हे चित्र स्पष्ट दिसून येते. जगातील काही देश गृहयुद्धाने भरडलेले आहेत त्यामुळे तीथेही रक्ताच्या नद्या वाहतांना दिसतात.पृथ्वीचा व निसर्गाचा विनाश वेळीच रोखला गेला नाही तर धरणीमाता पृथ्वीतलावर असणाऱ्या संपूर्ण जीवसृष्टीला गीळंकृत केल्याशिवाय राहणार नाही हेही तितकेच सत्य आहे.त्यामुळे जगातील नेत्यांनो आतातरी सावधान व्हा व पृथ्वीला वाचवण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करा अजुनही वेळ गेलेली नाही.कारण मानवाने आपल्या सुखसुविधांसाठी संपूर्ण हद्दी पार केल्याचे दिसून येते.या पृथ्वीतलावर लाखो प्रजातीचे प्राणी, पशुपक्षी, जीवजंतू वास्तव करतात. परंतु यात बुध्दीजीवी जात एकच आहे ती म्हणजे मानव आणि एकट्या मानवाने ही विनाशलिला उभी केली आहेत.त्यामुळे जगात दिवसेंदिवस भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे आणि याला मुख्य कारणीभूत फक्त बुध्दीजीव प्राणी म्हणजे मानवच आहे.जगात दिवसेंदिवस विनशलिला वाढतच आहे तरीही मानलाचा निसर्गावर व पृथ्वीवर होणारा अत्याचार अजुनपर्यंत थांबलेला नाही हे मानवजातीचे दुर्भाग्य म्हणावे लागेल.मानवाने आपला अतिरेक वेळीच थांबविला नाही तर म्यांमार-थायलंड पेक्षाही भयावह भुकंप किंवा महाप्रलय जगाच्या कानाकोपऱ्यात केव्हाही कधीही उद्भवू शकतात यालाही नाकारता येत नाही. असे सांगितले जाते की म्यांमार -थायलंडमध्ये आलेला भूकंप हा २०० वर्षांपूर्वी आलेल्या भूकंपापेक्षाही घातक असल्याचे सांगितले जाते.भारतात गुजरात मधील भुजमध्ये २६ जानेवारी २००१ ला ७.७ तीव्रतेचा भूकंप आलेला होता.तेव्हा या भूकंपात २० हजार लोकांचा मृत्यू झाला होता व दिड लाखांपेक्षा जास्त लोक गंभीररीत्या जखमी झाले होते आणि मोठ्या प्रमाणात वित्तीय हानी सुध्दा झाली होती. वैज्ञानिकांकडुन सांगितले जाते की भूकंपचा केंद्र असलेला म्यानमार मधील मांडाले क्षेत्र संवेदनशीलमध्ये गणल्या जाते. भारतीय आणि यूरेशियन प्लेट यांच्यात टकराव झाल्याने २८ मार्चला भिषण भूकंप आला.या सर्वच घटनांना कारणीभूत आपणच आहोत.आज युद्धजन्य परिस्थिती व बदलते हवामान यामुळे अनेक पशुपक्षी लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.त्यामुळे संपूर्ण परिस्थिती पाहता जगातील संपूर्ण देशांनी येणाऱ्या नैसर्गिक आपदांपासुन सावध रहाण्यासाठी निसर्गाची जोपासना केली आहे.कारण म्यानमार -थायलंड आलेल्या अती तीव्रतावाल्या भुकंपाने भारतातील अरूणाचल प्रदेश,पश्चिम बंगाल येथे झटके जानवले सोबतच चीन, व्हियेतनाम,तायवान, आणि लाओस याठिकाणी सुध्दा भूकंपाचे झटके जानवले.म्हणजे नैसर्गिक आपदा केव्हा व कुठे येईल हे सांगता येत नाही.आग व पाणी यांच्याशी खेळू नका कारण आग केव्हा भस्मसात करेल ते सांगता येत नाही व पाणी केव्हा कुठे वाहुन नेईल व  डुबवेल हेही सांगता येत नाही त्यामुळे सावधान!कारण या जखमा कधीच भरून निघु शकत नाही.त्यामुळे जगातील देशांनो पृथ्वीच्या रक्षणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करा तेव्हाच आपण येणाऱ्या नैसर्गिक महाप्रलयाला थोडा का होईना अंकुश लावु शकु.
-रमेश कृष्णराव लांजेवार

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments