Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादभारतीय सैन्य भरती रॅली; ऑनलाईन नोंदणीची सुविधा

भारतीय सैन्य भरती रॅली; ऑनलाईन नोंदणीची सुविधा

भारतीय सैन्य भरती रॅली; ऑनलाईन नोंदणीची सुविधा

छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)-भारतीय सैन्य दलातील भरतीसाठी अधिसूचना अप्रकाशित करण्यात आली असून ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा सैन्य दलाच्या वेबसाइट www.joinindianarmy.nic.in वर उपलब्ध करण्यात आली आहे.

भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती याप्रमाणे-

ऑनलाइन सामान्य प्रवेश परीक्षा (CEE): सर्व उमेदवारांसाठी नामांकित केंद्रांवर CEE परीक्षा होईल.अग्निवीर लिपिक/SKT श्रेणीसाठी टायपिंग चाचणी देखील घेतली जाईल. CEE उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती रॅलीदरम्यान शारीरिक चाचणी आणि मापन चाचणी होईल.ॲडाप्टेबिलीटी चाचणीसाठी उमेदवारांनी उमेदवारांनी यापूर्वीच कार्यरत असलेला स्मार्ट फोन, पुरेशी बॅटरी आणि 2GB डेटा सोबत आणणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठी दि.१० एप्रिल पर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.

अग्निवीर उमेदवारांसाठी विशेष सुविधा: उमेदवार त्याच्या पात्रतेनुसार कोणत्याही दोन श्रेणींसाठी अर्ज करू शकतो. दोन पर्याय निवडणाऱ्या उमेदवारांना दोन्ही गटांसाठी वेगवेगळे अर्ज भरावे लागतील व प्रत्येक श्रेणीसाठी वेगळी CEE परीक्षा द्यावी लागेल.मात्र, फक्त एकदाच भरती रॅली व वैद्यकीय चाचणी द्यावी लागेल.क्रीडा खेळाडू, NCC प्रमाणपत्रधारक, ITI प्रशिक्षित आणि डिप्लोमा धारकांना विशेष गुण मिळतील. नोंदणी व परीक्षा प्रक्रियेबद्दल व्हिडिओ आणि सराव मॉक टेस्ट भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments