वडवाळी गावअपेगाव हिरडपुरी,नवगाव,वडवाळी नाला पुल,
बेसुमार रेती उपसा
वाळू विरोधी महिला पथक फक्त नावालाच
पैठण/प्रतिनिधी/ बबन उदावंत /पैठण तालुक्यातील गोदावरी पात्रातील हजारो बरा रेती उत्खनन बिंदासपणे चालू आहे वडवाळी, अपेगाव हिरडपुरी नवगाव वाळु माफियाची हिमत वाढली असे समजते सारग चव्हाण लाच प्रकरणी गुतल्यानंतर दत्ता भारसकर रुजु तहसीलदार म्हणून पदभार घेतला परतु तीनच दिवसात रेती माफिया यांच्या दास्तीने पदभार सोडला त्यानंतर झापले यांनी पदभार घेतला त्यांचेही वाळू माफियाकडे दुर्लक्ष दिसून येत आहे
महसूल व पोलिस प्रशासनाची याकडे डोळेझाक सुरू आहे.
गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून त्याचा जादा दाम लावून विक्री करण्यात येत आहे. अवैध वाळू उपशामुळे शासनाचा मोठा महसूल बुडत आहे.
एक ते दोन हजार रुपये ब्रास असलेल्या वाळूचा भाव आता पाच ते सहा हजार रुपये ब्रासवर गेला आहे.
पैठण तालुक्यात दिवसान दिवस वाढत असलेल्या अवैध्य वाळू उपसा आणि गोण खनिज उत्खनन आळा घालण्यासाठी महसूल विभागाने मोठा गाजावाजा सह महिला पथक स्थापन केले होते मात्र या पथकाने अद्याप कोणत्याही ठोस कारवाई केली नसल्याचे पूर्णपणे निष्क्रिय ठरले आहे केवळ कागदोपत्र अस्तित्व असलेल्या पथकामुळे वाळू माफ्याचे फावले असून तालुक्यात सरासर वाळू तस्करी सुरू आहे
वडवाळी येथील काही वाळु उत्खनन करण्याचे साहित्य हे हस्तगत करून जागीच जाळण्यात आले असले तरी त्या कारवाई चा काहिच परिणाम वाळू उत्खनन करण्यावर झालेला दिसून येत नसल्याचे निदर्शनास येत आहेत
तरी या वाळु माफिया वर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे