सोयगाव शेदुर्णी रस्त्याची दूरवस्था झाल्याने प्रवासी त्रस्त
सोयगाव / प्रतिनिधी /सोयगाव शेंदुर्णी, ता. जामनेर खान्देशची व मराठवाड्याची सीमा जोडणाऱ्या सोयगाव ते शेंदुर्णी रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली असून अनेकवेळा लेखी निवेदने देऊन व आंदोलन करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. जिव्हाळाचा या रस्त्याचे काम त्वरित करावे अशी मागणी पुढे येत आहे.
सात किलोमीटरचा रस्ता असून सा . बा. बांधकाम विभागाने गेल्या महिन्याभरापूर्वी थातूरमातूर काम केले मात्र पावसाळ्यापूर्वीच सर्वत्र धुळ उडत आहे तर जळगाव विभागा अंतर्गत गेल्या कित्येक महिन्यांपासून हा रस्ता तसाच आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार निवेदन देऊन तसेच खासगी वाहतूक संघटनेसह उद्धवसेनेने रास्ता रोको करूनही रस्त्याची दुर्दशा कमी झालेली नाही, असे सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.
भाविकांची रस्त्यावर असते कायम वर्दळ
अजिंठा लेणी व भगवान चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेंदुर्णी येथे मोठ्या संख्येने भाविक जातात. शेंदुर्णी तसेच जाळीचादेव येथे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो.
तसेच सोयगाव येथून विद्यार्थी, पालक तसेच व्यापारीऱ्यांची वर्दळ याच रस्त्यावरून असते. त्यामुळे हा रस्ता कायम रहदारीचा असतो. असे असतांना अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रस्ता विकासापासून दुर्लक्षित राहिला आहे.
७ किमी लांबीच्या रस्त्याचे काम अजूनही वर्षांपासून हा रस्ता रखडलेलाच. आहे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. याकडे अधिकाऱ्यांनी या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे,प्रवाशांचा अंत पाहू नये.